आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहराचा पारा १० अंशांवर, कमाल तपमान ३० अंश सेल्सिअसवर कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील तपमानात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी नाशिक शहरातील तपमानाचा पारा १०.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. तर, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १० अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.
गुलाबी थंडीचा हंगाम खरा तर नोव्हेंबरमध्येच सुरू होतो. मात्र, यंदा वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना बेमोसमी पावसाचा सामना करावा लागला. ढगाळ वातावरणाचा परिणाम झाल्याने थंडीचा मोसम लांबला. ऑक्टोबर हीटनंतर शहरवासीयांना खरी ओढ ही गुलाबी थंडीची असते. थंडीच्या हंगामात व्यायामशाळेत जाणे, मॉर्निंग वॉक, धावणे यासारख्या व्यायामांना अधिक पसंती दिली जाते. परंतु, यंदा लांबणीवर पडलेल्या थंंडीच्या शहरवासीय प्रतीक्षेत होते. सध्या तपमानात घसरण होत असल्याने सायंकाळपासूनच वातावरणात गारवा निर्माण होत असल्याने रात्री रस्त्यावरील गर्दी कमी होत आहे. परंतु, मैदाने जॉगिंग ट्रॅकवर गर्दी दिसून येत आहे. सोमवारपासून किमान तपमान हे १० अंशांवर आले आहे, तर कमाल तपमान हे ३० अंशांवर कायम आहे.
बातम्या आणखी आहेत...