आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पारा 5.8, पिंपळगावला 4.2 वर; राज्यातील नीचांकी तपमानाची नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तरेतील बर्फवृष्टी तसेच पश्चिमी चक्रावातामुळे ताशी ते किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला अाहे. नाशिक शहरात बुधवारी हंगामातील ५.८ एवढे नीचांकी तपमान नोंदविण्यात आले. निफाडला पारा तर पिंपळगाव बसवंतला तो ४.२ अंशावर घसरला असून राज्यातील ते नीचांकी तपमान ठरले. मध्यंतरी किमान तपमान हे १२ ते १३ अंशांपर्यंत गेले होते. परंतु, पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतात अजून तीन ते चार दिवस बर्फवृष्टीचा अंदाज अाहे. त्यामुळे तेथून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र गारठलेलाच राहणार आहे.
 
राज्यातील किमान तपमान असे 
{अहमदनगर: ७.१ 
{मालेगाव : ७.४ 
{औरंगाबाद : ७.६ 
{पुणे : ७.७ 
{जळगाव : ८.० 
{महाबळेश्वर :१२.०