आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: शहरात कमाल तपमान 40.9 अंश, उन्‍हाच्‍या तीव्रतेने रस्‍त्‍यावरील वर्दळ कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात गुरुवारी हवामान केंद्रात सर्वाधिक तपमानाची नाेंद झाली. हवामान केंद्राच्या ग्राफवर दुपारी 1 वाजेच्या सुमारास सध्याचे सर्वाधिक 40.9 अंश सेल्सिअस अशी नाेंद झाली. - Divya Marathi
शहरात गुरुवारी हवामान केंद्रात सर्वाधिक तपमानाची नाेंद झाली. हवामान केंद्राच्या ग्राफवर दुपारी 1 वाजेच्या सुमारास सध्याचे सर्वाधिक 40.9 अंश सेल्सिअस अशी नाेंद झाली.
नाशिकरोड - शहरात सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने गुरुवारी (दि. १३) कमाल तपमानाचा पारा हा ४०.९ अंश सेल्सिअसवर गेला होता. तर किमान तपमानाचा पारा हा १८.८ अंशावर गेला आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नेहमीपेक्षा रस्त्यावर वर्दळ कमी हाेती. नागरिकांना दोन आठवडे उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करावा लागणार असून, ४१ ते ४२ अंशांच्या दरम्यान कमाल तपमानाचा अंदाज आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे तपमापकाचा पारा ४२.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला तर नाशिकचा पारा हा ४०.९ अंशावर गेला आहे. कमाल तपमानामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या दिनचर्येमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिकरोड, देवळाली कॅम्प, पंचवटी, सातपूर, सिडको, काॅलेजराेड, शालिमार, शरणपूररोड, गंगापूररोड परिसरातील दुकानांमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून येते. तर दुपारी उन्हामुळे ग्राहकच येत नसल्याने व्यावसायिक व्यवसाय बंद ठेवायला लागले आहे.

 
बातम्या आणखी आहेत...