आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद, माेर्चे, दगडफेकीने मालेगावमध्ये तणाव, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाणीचे पडसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव (जि. नाशिक) - बजरंग दलाचे कार्यकर्ते व विश्व हिंदू परिषदेचे मालेगाव प्रखंड जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के यांच्यावर साेमवारी (दि. १४) झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी बुधवारी शहरात बंद पाळला. तसेच शहरातून दाेन स्वतंत्र माेर्चे काढण्यात अाले. दाेन ठिकाणी किरकाेळ दगडफेकही झाली. शहरात अजूनही तणावाची परिस्थिती असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  विशेष पाेलिस महानिरीक्षक विनय चाैबे यांनी शहरात धाव घेऊन पाेलिस बंदाेबस्त वाढविण्यात अाला हाेता.

रविवारी शिर्के व इतरांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकास बेदम मारहाण केली हाेती. त्यानंतर साेमवारी दुपारी तीन दुचाकींवर अालेल्या अाठ ते दहा जणांनी शिर्के यांना बेदम मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ  भाजप, विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी रात्रीच  (दि. १४) शहर बंदचे अावाहन केले हाेते. त्यानुसार बुधवारी शहरात बंद पाळण्यात अाला. दरम्यान, परिस्थिती चिघळू नये म्हणून पाेलिसांनी माेठा  बंदाेबस्त तैनात केला हाेता.
 
दुपारी ११ च्या सुमारास एकत्र अालेल्या जमावालाही पांगविण्यात पाेलिसांना यश अाले, त्यापैकी दाेघांना ताब्यातही घेण्यात अाले. नंतर सटाणाराेड व कलेक्टर पट्टा भागातून तरुणांचा माेठा समूह लाेढा मार्केटजवळ जमला. शिवसेना पदाधिकारी संजय दुसाने व प्रमाेद शुक्ला यांची पाेलिसांशी बाचाबाची झाली. काही वेळाने हिंदू संघटना समर्थकांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माेर्चाचे सभेत रूपांतर झाले. शिवाजी महाराज चाैकातील चित्रपटाच्या फलकावर काही तरुणांनी दगडकेक केल्याने या भागात धावपळ उडाली. त्यामुळे  पाेलिसांनी तत्काळ हा रस्ता वाहतुकीला बंद केला. दरम्यान, या प्रकारामुळे दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता हाेती.
 
शिवसेनेने काढला स्वतंत्र माेर्चा   
भाजप व हिंदू संघटना समर्थकांचा माेर्चा निघाल्यानंतर शिवसेनेचा स्वतंत्र माेर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात अाला. शिर्के यांच्या समर्थनार्थ दाेन्ही माेर्चे असले तरी समविचारी संघटनांमध्ये पडलेली फूट प्रकर्षाने लक्षात अाली. संजय दुसाने, प्रमाेद शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने काढलेल्या माेर्चेकऱ्यांनी प्रांत अजय माेरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.  
बातम्या आणखी आहेत...