आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार मोफत समुपदेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - निराश आणि वैफल्यग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना त्वरित समुपदेशन देण्यासाठी सुशांत वैद्य फाउंडेशनने पुढाकार घेतला असून, इयत्ता दहावीच्या निकालानंतर आत्मविश्वास ढासळलेल्या विद्यार्थ्यांचे या संस्थेतर्फे मोफत समुपदेशन केले जाणार आहे.

दहावी-बारावी परीक्षेत अपयश आलेल्या किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिक आधाराची मोठय़ा प्रमाणावर गरज असते. त्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने समुपदेशकही नेमण्यात आले आहे. मात्र, वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे अनेकदा या समुपदेशकांना एकाच वेळी आलेल्या एकापेक्षा अधिक कॉल येतात. यामुळे काही विद्यार्थी समुपदेशनापासून वंचित राहण्याची शक्यता असते. हीच बाब हेरत सुशांत वैद्य फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून स्वत: तज्ज्ञ नेमत त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचे मोफत समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.


इयत्ता दहावीच्या निकालाच्या आदल्या रात्रीपासून ते निकालानंतर 24 तास हे तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही क्षणी कुठलीही अडचण आल्यास तत्काळ या तज्ज्ञांशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज (9423177739), शरद सावळकर (8928337157), सोनल पवार (9604115677), आविष्कार गांगुर्डे (9665433145), किरण अहिरराव (7588304023), ललित कपिल (9819966489), निवेदिता रॉय-चैधरी (9970029924), पुभाली रे (8007994777), प्रमोद वाघ (8983564116), जीवन तांदळे (9767359921)


काय आहे सुशांत वैद्य फाउंडेशन
सुशांत वैद्य फाउंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकीतून कार्य करते. या मार्फत शिक्षकांनी समुपदेशनाची जबाबदारी कशी पार पाडावी यासाठी त्यांनाही मार्गदर्शन केले आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांची आणि बालकांची अभिक्षमता मापण चाचणी, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरांचेही मोफत आयोजन केले जाते.


समुपदेशनाचा लाभ घ्यावा
नेमलेल्या तज्ज्ञांचे फोन निकालाच्या काळात 24 तास सुरू राहणार आहेत. ते केवळ विद्यार्थ्यांचेच नाही तर पालकांचे आणि गरज लागल्यास समाजातील कुठल्याही व्यक्तीचे समुपदेशन करतील. त्याचा फायदा सर्वांनीच घ्यावा. डॉ. अश्विनिकुमार भारद्वाज

तज्ज्ञ करणार समुपदेशन
संस्थेकडून नेमण्यात आलेले सर्व तज्ज्ञ मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतलेले आहे. एकूण दहा समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक निकालाच्या काळात 24 तास सुरू राहणार आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबरच कुठलीही व्यक्ती या कालावधीत मदत घेऊ शकते.