आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकरावीसाठी दहा टक्के वाढीव जागा, प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी देणार मान्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. शहरातील विविध महाविद्यालयांत आतापर्यंत १८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले अाहेत. पहिल्या तिन्ही याद्यांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता चौथ्या यादीतील तसेच मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश दिले जात आहेत. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशापासून काेणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांच्या मागणीनुसार दहा टक्के वाढीव जागांना मान्यता दिली जाईल, अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नवनाथ आैताडे यांनी दिली.

अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या कट अाॅफ टक्केवारीने यंदा उच्चांक गाठला. त्यामुळे पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश अल्प प्रमाणात झाले होते. या यादीत संधी हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीकडे लागले होते. परंतु, त्याही याद्या यंदा उच्चांकी राहिल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कसरत करावी लागली. शहरातील महाविद्यालयांत २० ते २१ हजार जागा उपलब्ध आहेत. पहिल्या चारही याद्यांनुसार साधारण १८ हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रवेश मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी गरज पडल्यास वाढीव जागा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहितीही आैताडे यांनी दिली.

अाजपासून घेणार अाढावा
अकरावीची ५० हून अधिक कनिष्ठ महाविद्यालये अाहेत. पहिल्या तिन्ही गुणवत्ता याद्यांनंतर १८ हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले, तर दाेन ते तीन हजार जागांसाठीचे प्रवेश बाकी आहेत. गुरुवार, जुलैपर्यंत प्रवेशाची संधी राहणार असून त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...