आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Twelth Standard 17 Form Fill Until 31 October

दहावी-बारावी १७ नंबर फॉर्मची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फेब्रुवारी-मार्च२०१६ मधील दहावी बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना १७ क्रमांकाच्या अर्जाची नावनोंदणी ३१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार असल्याचे माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या विभागीय सचिवांनी कळविले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी थेट अर्ज योजनेंतर्गत ही सुविधा दिली जाईल.
बारावीची परीक्षा बाहेरून देणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ क्रमांकाचा अर्ज त्याद्वारेच भरता येणार आहे. नियमित अर्ज करण्याची किंवा नाव नोंदणीची मुदत संपली असल्याने अतिविलंब शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनीही संबंधित माध्यमिक शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अर्ज भरणे अनिवार्य असून शाळा-महाविद्यालयांनीही नोंद घेण्याचे मंडळाने आदेश दिले आहेत.