आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrace Garden Competition News In Marathi, Divya Marathi

‘गच्‍चीवरची परसबाग’ स्पर्धेसाठी 31 जुलै अंतिम मुदत,‘दिव्य मराठी’चा व्हेजिटेबल टेरेस गार्डनचा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घराजवळ विविध पद्धतीने पालेभाज्या, फळभाज्या, फळे पिकविणा-या परसबाग मित्रांची प्रयोगशीलता जपण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘दिव्य मराठी’ आणि ऑरगॅनिक व्हेजिटेबल टेरेस गार्डन संस्थेतर्फे ‘गच्चीवरची बाग’ या स्पर्धा घेण्यात येत आहेत. यात घराच्या छतावर, गच्चीवर किंवा आजूबाजूच्या परिसरात परसबाग फुलवायची आहे. सहभाग घेण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै असून, त्यानंतर सहभागी स्पर्धकांच्या गृहभेटी परीक्षकांकडून घेण्यात येणार आहेत.

घराच्या आजूबाजूला छानशी बाग असावी, असे प्रत्येकाला वाटते. सकाळी-सकाळी टवटवीत फुलं आणि हिरव्यागार पानांकडे बघितलं तरी दिवसभर फ्रेश मूड राहतो. या बागेतील ताज्या आणि कीटकनाशकविरहित पालेभाज्या आणि फळभाज्या खातानाही मजा येते. पण, जागेअभावी प्रत्येकालाच अशी बाग फुलवता येतेच असे नाही. या पार्श्वभूमीवर परसबाग स्पर्धा घेण्यात येत आहे.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सम्यक ग्रीन अ‍ॅण्ड सर्व्हिसेसचे संचालक मंदार वैद्य, किचन वेस्ट मॅनेजमेंटतज्ज्ञ सरस्वती कुवळेकर व ऑरगॅनिक व्हेजिटेबल टेरेस गार्डनचे संचालक संदीप चव्हाण हे काम बघणार आहेत. अधिक माहितीसाठी संदीप चव्हाण यांना 9850569644 या मोबाइल क्रमांकावर किंवा mindblowingsandip@yahoo.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनदेखील आयोजकांकडून करण्यात आले आहे.

परबागदिनी निकाल...
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 31 जुलैपर्यंत स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. स्पर्धेचा निकाल ‘परसबागदिनी’ म्हणजेच दि.24 ऑगस्ट रोजी होणा-या विशेष कार्यक्रमात जाहीर केला जाणार आहे.