आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TET Application Fill Up Dateline Extended Till 17 November

‘टीईटी’साठी अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) ऑनलाइन अर्ज करताना वीज नसणे, सर्व्हर डाउन असणे या प्रकारांमुळे बहुतांश विद्यार्थी हे यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे शेवटी-शेवटी प्रमाणपत्र तपासणीसाठी केंद्रावर गर्दी झाल्याने उमेदवारांची गैरसोय झाली होती. या परीक्षेपासून कोणताही डी.एड. आणि बी.एडधारक वंचित राहू नये म्हणून शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यापासून ते प्रमाणपत्र जमा करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
१५ हजार ४४५ उमेदवारांनी दि. नोव्हेंबरपर्यंत अर्ज जमा केले होते. या पात्रता परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली होती. जिल्ह्यात डी.एड. आणि बी.एड.धारकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेसाठीही उमेदवारांची गर्दी आहे. परंतु, ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित राहात असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गैरसोय झाली होती. त्यामुळे अनेक खासगी शाळेतील शिक्षिका, शिक्षक हे अर्ज भरण्यापासून वंचित असल्याने शासनाने त्यास मुदत वाढवून दिली.

परीक्षा‌र्थींना दिलासा..
टीईटीसाठी उमेदवारांची गैरसोय नको म्हणून शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जे उमेदवार वंचित राहणार होते त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यांनी त्वरित अर्ज भरावेत. पी.एस. चिंचोरे, शिक्षण विस्तार अधिकारी