आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीईटी’वर आता कॅमेर्‍यांची नजर; 31 हजार परीक्षार्थी देणार परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्य शासनाने शिक्षकांना यापुढे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक केली आहे. येत्या 15 डिसेंबरला होणार्‍या या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर कॅमेर्‍यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून या परीक्षेसाठी सुमारे 31 हजार परीक्षार्थींनी अर्ज केले आहेत.
तालुकानिहाय परीक्षा घेणे अशक्य असल्याने नाशिकमध्येच 105 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील शाळांमध्ये केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. परीक्षेचे नियोजन जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. एकाच दिवशी सुमारे 31 हजार विद्यार्थी शहरात परीक्षा देणार असल्याने पोलिस यंत्रणेवरदेखील ताण राहणार आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षेदरम्यान कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रासाठी केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, विभागीय अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक राहणार आहेत.
नियोजनासाठी विशेष प्रयत्न
परीक्षा एकाच दिवशी असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. विद्यार्थिसंख्या जास्त असल्याने नियोजनही त्याच पद्धतीने करावे लागत आहे.
- रहिम मोगल, प्राथमिक शिक्षणाधिकारी