आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अापत्काळात संदेशांसाठी ‘टेक्स्टर’, नाशिकच्या तीन तरुणांनी केली अॅप्लिकेशनची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्हाॅट्सअॅपसारख्या साेशल मीडियाचा वापर करून संदेशांची देवाणघेवाण दिवसभर सुरू असली तरीही अापत्कालीन परिस्थितीत या मीडियाचा वापर तत्काळ हाेणे तसे अवघडच अाहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे व्हाॅट्सअॅप ग्रुपला सदस्य संख्यांची मर्यादा अाहे. ही बाब हेरून नाशिकमधील तीन तरुणांनी एकत्र येऊन वन-वे कम्युनिकेशन हाेऊ शकेल, अशा टेक्स्टर अॅप्लिकेशनची निर्मिती केली अाहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एका वेळी काेट्यवधी लाेकांपर्यंत काही क्षणांच्या अात संदेश पाेहाेचविता येणे शक्य झाले अाहे. सिंहस्थकाळात अापत्कालीन परिस्थितीत या अॅप्लिकेशनचा माेठा वापर हाेऊ शकताे.

गेल्या सिंहस्थात चेंगराचेंगरीच्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला हाेता. असंख्य भाविक जखमी झाले हाेते. यावेळी पाेलिसांच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात अाली हाेती. परंतु, ही माहिती देण्यासाठी पाेलिसांना काही दूरचित्रवाणी वाहिन्यांची मदत घ्यावी लागली. त्यावेळी सर्वच नाशिककर ही वाहिनी बघत हाेतेच याची शाश्वती नव्हती. अशा परिस्थितीत टेक्स्टरसारखे अॅप्लिकेशन उपयुक्त ठरू शकते. अापत्कालीन परिस्थितीत या अॅप्लिकेशनचा अधिक उपयाेग हाेणार अाहे. सरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था अाणि काॅर्पाेरेट संस्था यांना या अॅप्लिकेशनचा अधिक उपयाेग हाेऊ शकताे. या अॅप्लिकेशनद्वारे एकावेळी असंख्य संदेश पाठविता येतात. हेच संदेश अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून दिल्यास त्याला शुल्क माेजावे लागते. परंतु टेक्स्टर अॅप्लिकेशन डाउनलाेड केल्यास संदेश पाठविण्यासाठी काेणतेही शुल्क लागत नाही.

काॅम्प्युटरवरूनही पाठवा संदेश
माेबाइलसहकाॅम्प्युटरवरही या अॅप्लिकेशनचा वापर करता येताे. म्हणजेच काॅम्प्युटरवरूनही संदेश पाठविता येतात. सिंहस्थकाळात या अॅप्लिकेशनचा माेठा उपयाेग हाेईल. या दृष्टीने सिंहस्थाचे सर्व अपडेट अॅपद्वारे लाेकांना समजू शकतील. मुकुंद पटवर्धन, निर्माता, टेक्स्टर

पीडीएफ, एक्सल शिटचा वापर
अाजवरटेक्स्ट अाणि इमेजेसचा वापर या अॅप्लिकेशनमध्ये हाेत अाहे. यापुढे पीडीएफ अाणि एक्सेल शिटचा वापर करता येणार अाहे. यासाठी अट इतकीच अाहे की, संदेश पाठविणारे अाणि स्वीकारणारे यांच्याकडे टेक्स्टर अॅप्लिकेशन डाउनलाेड असणे गरजेचे अाहे. विक्रांत मेटकर, निर्माता, टेक्स्टर
अॅप्लिकेशन उपयुक्तता
>सदस्य संख्येची मर्यादा नाही.
>संदेशाच्या अाकाराची मर्यादा नाही.
>कितीही ग्रुप तयार करता येतात.
>टेक्स्ट अाणि इमेज पाठविता येते.
बातम्या आणखी आहेत...