आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडचा संघ नाशकात खेळणार कबड्डी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अस्सल मराठी खेळ म्हणून ओळखल्या जाणा-या कबड्डीचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय कबड्डीत नावाजलेला थायलंडच्या पुरुष आणि महिलांचा संघ ऑगस्टच्या प्रारंभी नाशकात सहा दिवसांच्या दौ-यावर येणार आहे.
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येथील क्रीडा प्रबोधिनीतर्फे विशेष उपक्रम आयोजण्यात आला आहे. 31 जुलैला थायलंडचा महिला व पुरुष संघ नाशकात येण्याची चिन्हे आहे. राज्यातील दिग्गज संघांसमवेत ते सामने खेळणार आहेत.

कोल्हापूरचे प्रशिक्षक : थायलंडच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून कोल्हापूरचे माजी राष्ट्रीय खेळाडू रमेश भेंडगिरे हे काम पाहात आहेत. तर, महिला संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांच्या पत्नी व माजी राष्ट्रीय खेळाडू उमा भोसले - भेंडगिरी या आहेत.
कबड्डीच्या प्रसारासाठी सकारात्मक पाऊल
प्रथम आशियाई देश, त्यानंतर रा ष्ट्र कुल देश आणि त्यानंतर जगभरात कबड्डीचा प्रसार करण्याचें धोरण यापूर्वीच ठरले आहे. जपानने तायक्वांदो या स्थानिक खेळाचा आक्रमक पद्धतीने प्रचार केल्यामुळेच तो खेळ थेट ऑलिम्पिकपर्यंत धडक मारू शकला आहे.
थायलंडच्या खेळाडूंसाठी विशेष व्यवस्था
थायलंडच्या खेळाडूंची सर्व प्रकारची विशेष व्यवस्था ठेवण्यात येणार असून, त्यासाठी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कामाला लागले आहेत. नाशकात अशा प्रकारे प्रथमच दुस-या देशाचा राष्ट्रीय संघ येणार असल्याने कबड्डीप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
थायलंडचा संघ मजबूत
आंतरराष्ट्रीय स्तरावर थायलंडचा पुरुष संघ द्वितीय, तर महिलांचा संघ तृतीय क्रमांकावर आहे. थायलंडच्या महिला संघाने भारतीय महिलांना मागील सामन्यात पराभूत केले आहे.