आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Best Example Of Management Is Nashik KumbhMela

नाशिकमधील कुंभमेळा मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण, अमित शहांकडून काैतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळा हा विश्वातील असा एकमेव उत्सव अाहे, ज्याचे काेणाला निमंत्रण दिले जात नाही की काेणाला संपर्क साधून बाेलावले जात नाही, तरीही सुयाेग्य मुहूर्तावर साधू-महंत अाणि भाविक गाेदावरीच्या पवित्र स्नानासाठी कोट्यवधींच्या संख्येने एकत्र जमतात. या सर्वच बाबी अद्भुत असून मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हे उत्तम उदाहरण अाहे, असे गाैरवाेद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढले.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या वैष्णवपंथीय दिगंबर, निर्वाणी अाणि निर्माेही अाखाड्याचा ध्वजाराेहण समारंभ साधू-महंत यांच्यासह अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जगद््गुरू रामानंदाचार्य हंसदेवाचार्य महाराज, नरेंद्राचार्य महाराज, महंत ज्ञानदास महाराज, अाखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज, महंत कृष्णदास महाराज, महंत धरमदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, जगन्नाथ मंिदराचे विश्वस्त महेंद्रभाई झा, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत संजयदास महाराज, प. पू. अण्णासाहेब माेरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कुंभमेळ्याचे महत्त्व विशद करताना अमित शहा म्हणाले, दर बारा वर्षांनी देशात चार ठिकाणी हाेणाऱ्या कुंभमेळ्यांत नाशिकचा समावेश अाहे. या मेळ्याचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण अाहे. अमृत बिंदूचे नदीपात्रात पडणे अाणि गाेदावरी स्नानाने पापक्षालन हाेणे या सर्व बाबी धर्माच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. कुंभमेळा हे मॅनेजमेंटचेही एक अनाेखे उदाहरण अाहे. कित्येक वर्षांपासून हा मेळा सुरू असेल. कुंभमेळा नक्की कधी सुरू झाला याचा पुरावा अाजही काेणाकडे उपलब्ध नाही, तरीही चारही ठिकाणी याेग्य वेळी अाणि याेग्य मुहूर्तावर हा मेळा भरताे. त्यासाठी काेणाला निमंत्रण दिले जात नाही की काेणाशी संपर्क साधून बाेलवलेही जात नाही, तरीही जगभरातील कोट्यवधी हिंदू भाविक नाशिकसह प्रयाग, हरिद्वार अाणि उज्जैन येथे वेळेत येऊन स्नानाने पवित्र हाेतात. या कोट्यवधी लाेकांची व्यवस्था साधू-महंतांचे अाखाडे सरकारच्या मदतीने व्यवस्थितपणे करतात. असुविधेची झळ साधू-महंतांसह भाविकांना पाेहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी खरे तर हा संशाेधनाचा माेठा विषय अाहे. अशा प्रकारचा मेळावा धार्मिक उत्सव जगभरात काेठेही हाेत नाही. इतक्या माेठ्या समूहाला एकाच वेळी सर्व साेयी-सुविधा पुरवण्यात प्रशासनालाही यश येते. कुंभमेळा हा शाश्वत अाहे. ताे कधीही कालबाह्य झालेला नाही अाणि हाेऊ शकणारही नाही.
सकारात्मक ऊर्जेने संकटे हाेतील दूर
विविध अाखाड्याच्या ध्वजाराेहणानंतर नाशिकमधील कुंभमेळ्याला अाजपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला अाहे. या मेळ्यामुळे माेठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण हाेते. त्या सकारात्मक ऊर्जेमुळे अाणि साधू-संतांच्या अाशीर्वादाने राज्यावरील सर्व संकटेदेखील दूर हाेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या वेळी अमित शहा यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्यास ग्यानदास महाराजांनी परवानगी दिल्याचे सांगितले. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गाेडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अामदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, याेगेश घाेलप, जयवंत जाधव, सुधीर तांबे अादी उपस्थित हाेते. पाहुण्यांचे स्वागत महापाैर अशाेक मुर्तडक अाणि उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी केले.