नाशिक : शहरात सध्या डाळी अाणि तांदळाच्या स्वताईचा दरवळ अनुभवायला मिळताे अाहे, कारण आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत अाणि व्यापाऱ्यांनी भरविलेल्या स्वतंत्र तांदूळ महाेत्सवाचे. विशेष म्हणजे, या महाेत्सवातील दरफलकावर नजर टाकल्यास व्यापाऱ्यांनी तांदूळ, डाळींचे दर कमी केले अाहेत. ग्राहक पंचायतीने तांदूळ महाेत्सव भरविला की, व्यापारीही भाव उतरवितात ग्राहकांचा अापाेअापच फायदा हाेताे, असे ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी सांगितले.
जानेवारीपासून नवा तांदूळ बाजारात यायला सुरुवात हाेते अाणि म्हणूनच गृहिणी वर्षासाठीच्या डाळी, तांदूळ भरायला याच महिन्यापासून सुरुवात करतात. या काळात तांदळाचे दरही कमी हाेतात, मात्र अनेक व्यापारी दर कमी झाल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पाेहाेचू देत नाहीत. याला लगाम बसाविण्याच्या उद्देशाने ग्राहक पंचायत तांदूळ महाेत्सवाचे अायाेजन करते.
पंडित काॅलनीतील लायन्स हाॅल येथे भरविण्यात अालेल्या या महाेत्सवात नाशिककर रांगा लावून तांदूळ खरेदी करीत अाहेत. व्यापाऱ्यांनीही तांदूळ महाेत्सव सुरू केले असून, व्यापारी असाेसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी यावर्षी गंगापूरराेडवरील प्रमाेद महाजन गार्डनच्या बाजूच्या संकुलात महाेत्सव अायाेजित केला असून, त्यांच्याकडील दर ग्राहक पंचायतीपेक्षा कमी असल्याचे वास्तव अाहे.
ग्राहकांचा फायदा
- यावर्षी तांदळाचेदर बऱ्यापैकी कमी अाहेत. अाम्ही चाळीस तांदळाच्या जाती अाणि डाळी रास्त भावात या महाेत्सवातून उपलब्ध करून दिल्या अाहेत.
- प्रफुल्ल संचेती, संचालक, अाेम ट्रेडिंग कंपनी
पंचायतीचा उद्देश सफल
- ग्राहकपंचायतीचा उद्देशच मुळात बाजारातील दर रास्त व्हावेत असा अाहे. दर कमी हाेऊन ग्राहकांचा फायदा हाेण्याचा अामचा उद्देश सफल झाला.
प्रा. दिलीपफडके, राष्ट्रीय सहसचिव, ग्राहक पंचायत
अजूनही शहरात तूरडाळ शंभरावर
तूरडाळीचेदर ७४ रुपये किलाेपर्यंत अाले अाहेत, मात्र शहरात अनेक दुकानांतून अाजही ९० ते १२० रुपये किलाेने तूरडाळ विक्री हाेत असल्याचे समाेर अाले अाहे. या दाेन्ही महाेत्सवातील तूरडाळीच्या दरांवरून मात्र वास्तव दरात ग्राहकांना डाळ खरेदी करता येत अाहे.