नाशिक-अवकाळीपाऊस गारपीट यामुळे तीन-चार दिवसांपासून खालावलेल्या तपमानात काहीशी वाढ होत आहे. शुक्रवारी (दि. १९) शहरात ७.३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद हवामान केंद्रात झाली. पुढील दोन-तीन दिवसांत तपमानात विशेष वाढ होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदाच्या हंगामात तपमान ६.४ अंशांवर गेल्याने शहरासह जिल्हा जणू गारठला होता. या तपमानाची राज्यात नीचांकी नोंद झाली होती. त्यानंतर आता काही प्रमाणात त्यात वाढ झाली आहे. परंतु, ही वाढ अंशापेक्षा कमी आहे.