आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Corrupt And Lazy Officer's On Target By Manse

भ्रष्ट व कामचुकार अधिकारी मनसेच्या रडारवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आर्थिक अपेक्षा वा कामचुकारपणामुळे विकासकामांना खोडा घालणार्‍या अधिकार्‍यांबाबत थेट आयुक्त व महापौरांनाच महासभेत जाब विचारण्याची रणनीती मनसेकडून वापरली जाणार असून, नगरसेवकांना त्यासाठी आक्रमक होण्याच्या सूचना ‘राजगड’ येथील बैठकीत पक्षाचे पदाधिकारी व आमदारांनी केल्याचे वृत्त आहे.

बैठकीत विकासकामांना नेमके अडथळे कसे निर्माण होतात, याची माहिती जाणून घेतल्यावर कामचुकार तसेच भ्रष्ट अधिकार्‍यांची माहिती गोळा करून थेट महासभेत त्याबाबत नगरसेवकांना आक्रमक होण्याच्या सूचना देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांत अधिकार्‍यांकडेच नातेवाइकांच्या रूपात कंत्राटे असल्यामुळे त्याचीही माहिती गोळा करावी, असे सांगण्यात आले. जेणेकरून अधिकार्‍यांना चाप बसेल व विकासकामांना येणार्‍या अडचणी दूर होतील, असेही सर्मथन करण्यात आले. त्यासाठी महापौरांनाही अलर्ट राहण्याबाबत सांगितले गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नगरसेवकांचीही झाडाझडती
निवडून आल्यानंतर नगरसेवकांना पक्षाची आठवण राहत नाही. पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थिती नसते, अशा तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनाही संघटना व महापालिका अशा दोन्ही ठिकाणी सक्रिय राहण्याची तंबी आमदार वसंत गिते यांनी दिल्याचे समजते. पक्षाच्या कामकाजासाठी कोण येते, याचीही नोंद ठेवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले