आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू; डॉक्टरवर गुन्हा दाखल, देवळाली कॅम्प येथील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होण्याची घटना ताजी असतानाच होमिओपॅथीची पदवी असलेल्या डॉक्टरने महिलेवर अॅलोपॅथीचे चुकीचे औषधोपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुरुवारी (दि. २३) संशयित डॉक्टरविरोधात न्यायालयाच्या आदेशाने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन करता मृत्यूचे प्रमाणपत्र दिल्याबद्दलही गुन्हा दाखल केला अाहे. 
 
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती डॉ. अभिनंदन जाधव यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित डॉ. संजय रामलखन गुप्ता (रा. लॅमरोड) याने २० जून २०१५ राेजी देवळाली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले होते. संशयिताकडे होमिओपॅथीची पदवी अाहे. जून २०१५ मध्येच रूपा शहा (वय ४६) यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवता शहा यांच्यावर अॅलोपथी उपचार पद्धती माहिती नसताना चुकीचा उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. शिवाय, शवविच्छेदन करताच मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसतानाही रुग्णालयातील डॉ. योगिता टाक यांच्या खोट्या सह्या करून रुग्णाचे खोटे रिपोर्ट खोटे दस्त तयार केले. रुग्णालयाचे भागीदार असूनही वैयक्तिक पंजाब अँड सिंध बँकेत खाते उघडत त्या खात्यावर पैशांची अफरातफर केली. 

पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र, देवळाली कॅम्प पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने डॉ. जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी न्यायालयाने देवळाली कॅम्प पोलिसांना संशयित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये डॉ. गुप्ताच्या विरोधात खून, फसवणूक, बोगस दस्तावेज बनवणे आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...