आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवदान मिळूनही स्वच्छंद चितळ तळमळतेय पिंजऱ्यात, वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाच दिवसांपूर्वी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या पाठीमागे एका विहिरीत चितळ पडल्याने ते जखमी झाले होते. त्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे साडेतीन वर्षे वय असलेले आणि स्वच्छंद बागडणारे हरिण अजूनही पांडवलेणी परिसरातील नेहरू उद्यानात बिबट्या पकडण्याच्या पिंजऱ्यात एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे जेरबंद करण्यात आले आहे.
डोंबिवली नॅशनल पार्क, तानसा वनक्षेत्र आणि अमरावती वनक्षेत्रात आढळणारे चितळ (पाठीवर ठिपके असलेले हरिण) हे चुकून नाशिक शहर परिसरात आले की आणले गेले, याबाबत वनविभागाचे अधिकारी चौकशी करीत आहेत. मात्र, गुरुवारी (७ मे) हे चितळ डेमसे यांच्या विहिरीत पडल्याने ते जखमी झाले होते. त्याला वाचविण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले. मात्र, ते मुके चितळ वनविभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. या चितळाला मुक्तपणे वावरण्यासाठी त्याला त्याच प्रजातीच्या प्राण्यामध्ये सोडणे आवश्यक आहे. परंतु, त्यासाठी मुख्य वनसंरक्षक यांच्या परवानगीनंतर ते सोडले जाते. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य वनसंरक्षकांची परवानगी घेण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाच दिवस लागले. त्यामुळे त्या बिचाऱ्या चितळाला एखाद्या गुन्हेगारासारखी पिंजऱ्यात शिक्षा भोगावी लागत आहे. त्या चितळाला त्याच्या मूळ सहवासात त्वरित सोडण्यात यावे, अशी प्राणिमित्र मागणी करीत आहे.

सविस्तर माहिती घेतो
मीनाशिक रेंजचा आजच (सोमवार) पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे चितळाच्या संदर्भात मला काहीही माहिती नाही. याबाबत सांयकाळी माहिती घेईल.
प्रशांत खैरनार, नाशिक रेंज ऑफिसर