आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट शहरात प्रसाधनगृहांचे डर्टी पिक्चर, नाशिकमध्ये शौचालय मुताऱ्यांची प्रचंड वानवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक | धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक, आैद्याेगिक आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ‘स्मार्ट’ असलेल्या नाशिक नगरीत सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्यांच्या बाबतीत अतिशय ‘डर्टी पिक्चर’ दिसते. शहरात शाैचालय (स्वच्छतागृह) आणि प्रसाधनगृहांचा (मुताऱ्या) प्रचंड वानवा जाणवते. या मूलभूत गरजेकडे महापालिका प्रशासनाने केलेले दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यालाच बाधा निर्माण करणारे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने यापुढील काळात स्वच्छतागृह आणि मुताऱ्यांची संख्या वाढविणे आणि त्यांची स्वच्छता राखणे या बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा स्वच्छतेच्या स्पर्धेत महापालिका नापासही होऊ शकते.
धार्मिक क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून नाशिक प्रसिद्ध असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच शहरात शैक्षणिक संस्थांचीही संख्या वाढली आहे. उद्योग आणि व्यापारातही शहर प्रगती करत आहे. चकाचक रस्ते इमारतींमुळे शहराच्या श्रीमंतीत वाढ झाली आहे. मात्र, हे रस्ते आणि इमारतींमध्ये सार्वजनिक शौचालय मुताऱ्याच नसल्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट होते. नाशकातील बहुतांश महत्त्वाच्या रस्त्यांवर सार्वजनिक मुताऱ्या नाहीत. महिलांसाठी, तर बोटावर मोजण्याइतपत मुताऱ्या सुस्थितीत आहेत. मुताऱ्या ही प्रत्येकाची शारीरिक गरज असते. मात्र, याचा विचारच होत नाही. नोकरीनिमित्त अनेक महिला घराबाहेर पडतात. त्यांची मुताऱ्यांअभावी मोठी गैरसोय होते. अनेक महिलांना युरिनचा त्रास असतो. काहींना दर दोन तासांनी युरिनला जावे लागते. तसे केल्याने त्याचा गर्भाशयावर ताण पडतो.
तसेच मूतखडा, मासिक पाळीदरम्यान त्रास होतात. यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य संघटनेने सर्वेक्षण केले असून, तीन महिलांमागे एका महिलेला युरिन इन्फेक्शनचा त्रास असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. तीन तासांतून एक लिटर पाणी शरीरासाठी आवश्यक असते. मात्र, घराबाहेर युरिनला जावे लागूच नये, म्हणून महिला पाणी पिणे टाळतात. त्याचे आरोग्याच्यादृष्टीने विपरित परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीसाठी शहरातील मुताऱ्या आणि शौचालयांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे.
या उपाययोजनांची गरज
खासगी संस्थांचा विचार
बंगळुरू,केरळसारख्या ठिकाणी जाहिरात तत्त्वावर उत्पन्न मिळवून देण्याच्या बदल्यात खासगी संस्थांकडे स्वच्छतागृह व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
मूलभूत सुविधा अल्पच
महापालिकेमार्फत मुताऱ्या शौचालयांत पाणी, स्वच्छता डागडुजी अशा मूलभूत सुविधा योग्य प्रकारे पुरविण्यात आल्या नसल्याने खूप कमी महिलांकडून शौचालयांचा वापर होतो.
डीपीत हवे आरक्षण मुताऱ्या किंवा शौचालय बांधण्यास परिसरातील नागरिक विरोध करतात. त्यामुळे विकास आराखड्यातच शौचालय, मुताऱ्यांसाठी आरक्षण असावे.

नव्या मुतारीची सक्ती
शहरातील सार्वजनिक शौचालये आणि मुताऱ्या पाडण्यापूर्वी त्याच परिसरात ५० ते १०० मीटरवर दुसरे शौचालय आणि मुतारी बांधण्याच्या सक्तीचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शौचालय मुताऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. नाशिक महापालिकेनेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा.
संख्या वाढवावी
१६ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नाशिक शहरात केवळ १०७ मुताऱ्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ११ हजार लोकांमागे एक असे प्रमाण असावे. त्यात ३९५ सीट‌्स पुरुषांसाठी, तर १११ सीट‌्स महिलांसाठी आहेत.
स्वच्छता,पाणीही हवे
शहरातील बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पुरेसे पाणी, औषध फवारणी स्वच्छता नसते. तसेच सीट्सचीही मोडतोड झालेली असते. सध्या साडेपाच हजारांपैकी १,८५६ शौचालयांची देखभाल सुलभ तसेच पे अँड यूज तत्त्वावर होत आहे.
दुजाभाव दूर व्हावा
पुरुषांइतकीच महिलांचीही संख्या शहरातील रस्त्यांवर आणि गजबजलेल्या भागांमध्ये दिसते. परंतु, महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या मात्र अत्यल्प आहे. महिलांप्रति महापालिका असा दुजाभाव का करते, असा प्रश्न निर्माण होतो.
निकषांचे व्हावे पालन
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार प्रत्येक १०० पुरुषांमागे चार शाैचालय असावेत तर, १०० महिलांमागे पाच शौचालये असावेत. नाशिक महापालिकेने मात्र हे सर्वच निकष बासनात गुंडाळले आहेत.
काय आहे प्रक्रियेत
महापालिकेनेखासगीकरणातून नऊ स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पाऊले उचलली आहेत. तूर्तास एका कंपनीने या प्रकल्पासाठी तयारी दर्शविली आहे. या स्वच्छतागृहांमुळे महिलांची कुचंबणा थांबणार असली तरीही, स्वच्छतागृहे प्रत्यक्ष कधी उभी राहणार हेही निश्चित नाही.
पैसे द्या वापरातून व्हावे व्यवस्थापन
महापालिकाक्षेत्रात शौचालयाचे व्यवस्थापन उत्तमरीतीने राहावे म्हणून संपूर्ण लाेकसहभागातून शाैचालयास "पैसे द्या वापरा' या तत्त्वावर ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
खासगी शाळांमध्ये अत्यल्प स्वच्छतागृह
नाशिकमध्ये अनुदानित खासगी शाळा ७७ असून, विनाअनुदानित शाळांची संख्या १६२ आहे. त्यातील बोटावर मोजण्या एवढ्याच शाळांमध्ये स्वच्छतागृह असल्याचे निदर्शनास येते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नाशिक शहरात किती शौचालये आहेत...
बातम्या आणखी आहेत...