आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Eco Friendly Ganesh Devotees Immersed Of House

पर्यावरणस्नेही भक्तांनी घरातच केले गणेश विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आपल्या लाकड्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निराेप देतानाच ‘दिव्य मराठी’च्या अावाहनाला नाशिककर भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदा अनेक गणेशभक्तांनी पर्यावरण संवर्धन म्हणून आपापल्या घरातच बादलीभर पाण्यात गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
बादलीत पाणी घेऊन विसर्जन करून भक्तांनी ‘दिव्य मराठी’ला माेबाइलवरून त्याबद्दल माहिती कळविली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत बादलीत विसर्जन करणाऱ्यांची संख्या कमालीची या वर्षी वाढलेली दिसून येत हाेती. अनेक गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जनानंतर मूर्तीच्या मातीत तुळशीचे राेप लावून आपल्या लाडक्या गणरायाची अाठवण ताजी ठेवली. याप्रसंगी निर्माल्याचा वापर परसबागेत बहुसंख्य भाविकांनी खत म्हणून केला.

पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून ‘दिव्य मराठी’ जनजागृती करत अाहे. यंदा या जागृतीला मूर्त रूप अालेले दिसले. ‘दिव्य मराठी’ने विविध संस्थांच्या सहकार्याने नऊ ठिकाणी शाडू माती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या, यात तयार झालेल्या तब्बल दाेन हजार मूर्तींची प्रत्येकाने घरात प्रतिष्ठापना करण्याची शपथही घेतली. त्याप्रमाणे यंदा घरीच बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना माेठ्या प्रमाणात करण्यात अाली. इतकेच नाही, तर विसर्जन घरातील बादलीत करण्याच्या ‘दिव्य मराठी’च्या अावाहनाला प्रतिसाद देत अनंत चतुर्दशीला ठिकठिकाणी घरांतच विसर्जन करण्यात अाले.
कुटुंबीयांना समाधान
^अाम्ही शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्तीचे घरीच बादलीत विसर्जन केले. त्यामुळे पर्यावरण रक्षण केल्याचे सर्वच कुटुंबीयांना समाधान मिळाले. - डाॅ.करण पाटाेळे, पदाधिकारी, नाशिक युथ प्रतिष्ठान
डाॅ. करण पाटाेळे (सिद्धिविनायक काॅलनी, त्र्यंबकराेड), के. डी. चाैधरी (साईबाबानगर, सप्तशृंगी चाैक, सिडकाे) मिलिंद अात्माराम पाटील- (श्रेय अपार्टमेंट, गंगापूरराेड), अजय जाेशी (शुभम राे-हाउस, पाेकार काॅलनी), विशाल शशिकांत भणगे (विशाखा, अश्विननगर), अर्जुन पाराेलेकर (कृष्णाई साेसायटी, अशाेकनगर), रत्नाकर संत (कालिकानगर, उंटवाडी), प्रथमेश धनाईत (द्वारका अपार्टमेंट, चेतनानगर), वाल्मीक सूर्यवंशी (बायपासराेड, मालेगाव), प्रमाेद दुसाने (गाेकुळनगर, मखमलाबादराेड), प्राचार्य वर्षा पाटील डाॅ. राकेश पाटील (सुखी निवास साेसायटी, दीपाली नगर), विद्या विजय बागूल व्यंकटेश बागूल (पुष्पम अपार्टमेंट, त्र्यंबकराेड), पंकज मधुकर वारके (जाधव टाउनशीप, सातपूर), प्रफुल सुलाेधिया (गणेश अव्हेन्यू, इंदिरानगर), एन. एल. पाटील (नंदन रेसीडेन्सी, दत्तमंदिर राेड, नाशिकराेड), रेखा काबरा (विधान अपार्टमेंट, नाशिकराेड), सीमा अाणि ज्ञानेश्वर जगताप (सुभाष वाचनालय, बुधवार पेठ), संजय कुलकर्णी (श्री सारंग साेसायटी, हिरावाडी), जीवन भावसार (नाशिक), अशा विश्वास भट (गाेरक्षनगर, दिंडाेरी राेड), अजित भावसार (उज्ज्वला साेसायटी, सातपूर), सतीश मधुकर माळवदे (एनार्च साेसायटी, संभाजी चाैक), अनिल श्रीराम तरल (स्वामीराज पार्क, राणेनगर), गजानन चाेपडे ( अर्थवशिल्प, धात्रक फाटा), राेहिणी खैरनार (साईग्राम काॅलनी, अंबड लिंक राेड), शाम राठाेड (चैत्रबन साेसायटी, लवटे नगर), सचिन शिंत्रे (विनायक, पेठराेड), ऋत्विक महाशब्दे (मधुविजय काॅलनी, काॅलेजराेड), राहुल यशाेदा हिरामण जगताप (प्रणव रेसीडेन्सी, कार्तिकेयन नगर, कामठवाडे), श्री. साै. तुपे (पारिजातनगर, जेलराेड), मिलिंद चंपालाल चाैधरी (शक्तीकुंज साेसायटी, पवननगर), मनाेज भानसी (अभियंता नगर, कामटवाडे), एम. वाय गांगुर्डे (मंगलपार्क अपार्टमेंट, गाेविंदनगर), याेगेश सदाशिव गडाख (गणेश पार्क अपार्टमेंट, भाभानगर), विलास पुरकर (कर्मयाेगी जीवनस्वप्न साेसायटी, इंदिरानगर), मंगल जेठलिया (शुभरिद्धी अपार्टमेंट, नाशिकराेड), संदीप केंगे (कांचन प्राइड अपार्टमेंट, इंिदरानगर), देविदास भिसे (शिल्पशिखर साेसायटी, जेलराेड), सुशांत गाेरवाडकर (अथर्व अपार्टमेंट, वडाळा पाथर्डी राेड), महेश मधुकर नांद्रे (प्रल्हाद अार्केड, अशाेका मार्ग), डाॅ. सुदाम मल्हारराव पवार, (शैश, विधातेनगर, हिरावाडी राेड), सुनील पांडुरंग पवार (गाेविंदा, प्रसन्ना काॅलनी, इंदिरानगर), उत्तमराव जाधव (जयभवानी राेड), अभिजित खुर्दळ (सार्थक हाइट्स, सातपूर), एन. जाधव (विंचुरी दळवी), डाॅ. राजेश मधुकर नेहेते (सुयश अपार्टमेंट, तिडके नगर, उंटवाडी), विजया मधुकर राऊत (हृदय, खतीब डेअरीमागे), प्रवीण पवार (जुने सिडकाे), सुभाष मुजुमदार (नारायण पार्क, कलानगर), प्रशांत गाडगीळ (श्रीराम वाडी, एमजीराेड), अनिल पाटील (साैभाग्यनगर, गंगापूरराेड), नेहा कुलकर्णी (श्रेयसिद्धी साेसायटी, काॅलेजराेड), रिद्धी शर्मा (डिसूझा काॅलनी) तरंग चिटणीस (महात्मानगर), दुर्गेश जाेशी (सिडकाे) यांच्यासह शहर परिसरातील गणेशभक्तांनी घरातच बादलीत गणेश विसर्जन केल्याची माहिती दिली.

‘दिव्य मराठी’च्या प्रेरणेतून सार्व. मंडळातही उपक्रम
^प्रतिसाद बहुउद्देशीय संस्थेने यंदा शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. व्यसनमुक्तीचा संदेश देणारा देखावा सादर करीत सामाजिक बांधिलकी जपलीच, शिवाय संपूर्ण दहा दिवस इकाेफ्रेंडली पद्धतीने उत्सव साजरा केला बादलीत विसर्जन केले. याप्रसंगी पंकज देसाई, महेश अाव्हाड, गजानन नावळे, साेनाली बाेडके अादी उपस्थित हाेते. ‘दिव्य मराठी’ने प्रेरणा दिल्यामुळेच हा उपक्रम अाम्ही राबवू शकलाे. बबनबाेडके, संस्थापक अध्यक्ष, प्रतिसाद बहुउद्देशीय सेवाभावी मंडळ

लाडक्या गणेशमूर्तीची हेळसांड पाहवत नाही
^गेल्यासात वर्षांपासून अाम्ही गणपती विसर्जन बादलीत करीत अाहाेत. विसर्जनानंनर हाेणारी मूर्तीची हेळसांड बघून मनाला वेदना हाेतात. त्यामुळे बादलीत विसर्जनाला अाम्ही सुरुवात केली. अरविंद कुलकर्णी, गाेविंदनगर

श्रीगणेशाबद्दलची श्रद्धा आणि भावना महत्त्वाची
^एकाचमूर्तीची दरवर्षी प्रतिष्ठापना करताे. त्यामुळे प्रदूषण हाेत नाही. मनातली श्रद्धा अाणि भावना महत्त्वाची अाहे. -एम. बी. पाटील, उपकुलसचिव, य. च. मु. विद्यापीठ