आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The First Choice Of Delhi: Air Service Network Survey Of Social Media

पहिली पसंती दिल्लीला : विमान सेवेसाठी साेशल नेटवर्कद्वारे सर्वेक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिककरांना देशातील काेणत्या शहरांकरिता विमानसेवा अपेक्षित अाहे, याबाबतची चाचपणी सध्या सुरू असून, अात्तापर्यंत संकलित माहितीनुसार दिल्लीसाठी पहिली पसंती मिळाली अाहे.
येत्या दि. अाॅगस्टला एचएएलकडून विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांची बैठक नाशिक विमानतळावर हाेणार अाहे. या वेळी ही माहिती महत्त्वाचे ठरणार अाहे. ‘तान’कडून या बैठकीत शहराची विमानसेवेची गरज काय? काेणत्या शहरांसाठी, काेणत्या वेळेत सेवा अपेक्षित अाहे, ही माहिती सादर केली जाणार अाहे. वस्तूस्थिती कळावी यासाठी ‘तान’कडून हे सर्वेक्षण केले जात असून, त्याला अात्तापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला अाहे.
यासंस्थांकडून हाेतेय सर्वेक्षण :ट्रॅव्हल एजंट असाेसिएशन, निमा, अायमासारख्या संघटना, नाशिक सिटिझन फाेरम, क्रेडाई या शहर विकासात याेगदान देणाऱ्या संस्थांच्या सदस्यांकडून साेशल मीडियाद्वारे सर्वेक्षण सुरू अाहे. याकरिता संकेतस्थळावर माहिती मागविण्यात अाली असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळताे अाहे. मंगळवार सायंकाळपर्यंत ३६६ शहरवासीयांनी त्यांची विमानसेवेची गरज नेमकी काय अाहे? याबाबत या संकेतस्थळावर माहिती शेअर केली अाहे.

अापापल्या ग्रुपमध्ये वेबसाईट शेअर करा
http://goo.gl/forms/GaZDwUABiyहे संकेतस्थळ ‘तान’कडून प्रसिद्ध करण्यात अाले अाहे. यात सहा शहरांची नावे अाहेत. या शिवाय इतर कुठल्या शहराकरिता विमानसेवा असावी ती वेगळेपणाने नमूद करण्याचीही साेय यात अाहे. हे संकेतस्थळ नागरिकांनी अापल्या ग्रुपमध्ये शेअर करावे, असे अावाहन तानकडून करण्यात अाले अाहे.