आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या बाल नाट्यसंमेलनात रंगणार नाशिकची बालनाट्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘म्या बी शंकर हाय’ या बालनाटकातील एका दृश्यातील अभिनयाची जुगलबंदी. - Divya Marathi
‘म्या बी शंकर हाय’ या बालनाटकातील एका दृश्यातील अभिनयाची जुगलबंदी.
नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने यंदापासून नाट्य संमेलनासारखेच ‘बाल नाट्यसंमेलन’ भरविण्यात येणार अाहे. त्यानुसार पहिले बालनाट्य संमेलन साेलापूरला आयोजित हाेत असून, या नाट्यसंमेलनात फक्त नाशिकच्या दाेन बालनाट्यकृती सादर हाेणार असल्याची माहिती नाट्यपरिषदेचे मध्यवर्ती शाखेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अाणि नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी दिली.
मराठी रंगभूमीच्या चळवळीत बालरंगभूमीचे याेगदान अतिशय महत्त्वाचे अाहे. उद्याचे माेठे कलाकार याच बाल रंगभूमीतून घडत असतात. त्यामुळे ही बाल रंगभूमीची चळवळ अधिक सक्षम व्हावी, त्यातील विविध घटकांवर विचारविमर्श व्हावा या उद्देशाने नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या प्रयत्नांनी या वर्षापासून ‘अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ भरविण्यात येणार अाहे.

२७, २८ अाणि २९ अाॅगस्ट असे तीन दिवसांचे हे संमेलन सोलापूरमध्ये हाेत अाहे. पहिले संमेलन भरविण्याचा मान साेलापूरच्या रंगर्मींना जरी मिळाला असला तरी तेथे नाटक सादर करण्याचा मान मात्र नाशिकच्या कलाकारांना मिळाला अाहे. राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यस्तीय बालनाट्य स्पर्धेत नाशिकच्या अादर्श विद्या मंदिर शाळेच्या म्या बी शंकर हाय या नाटकाने प्रथम क्रमांक पटकवला हाेता. सागर रत्नपारखी यांनी हे नाटक दिग्दर्शित केले हाेते. हे नाटक नाट्यसंमेलनात हाेणार अाहे, तर बालरंगभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर गाजणारे नाशिकच्या नाट्यसेवा संस्थेचे ‘शामची अाई’ हे नाटकही संमेलनाच्या तीन दिवसांपैकी एक दिवस सादर हाेणार अाहे.

पूर्वी सिद्धार्थ अहिरे अाणि अाता महेश डाेकफाेडे हे दिग्दर्शक असलेल्या या नाटकाने अातापर्यंत ८०० प्रयाेगांचा टप्पा गाठला अाहे. ही दाेन्ही चांगली नाटके या पहिल्याच संमेलनात सादर हाेणार असल्याने नाशिकच्या रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण अाहे.

अंतिम निर्णय : १८ अाॅगस्ट
‘म्याबी शंकर हाय’ नाटकाने बऱ्याच वर्षांनंतर नाशिकला प्रथम क्रमांक दिला. नाटक खूप चांगला संदेशही देते. ‘शामची अाई’ तर जणू बालरंगककर्मींसाठीच अाहे. त्यामुळे या दाेन्ही नाटकांची निवड केली अाहे. अाता १८ अाॅगस्टला या संदर्भात मध्यवर्ती शाखेत बैठक हाेणार असून त्यावर शिक्कामाेर्तब हाेईल अाणि नाटकाची तारीख, वेळही त्यावेळी ठरविण्यात येईल. सुनील ढगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, नाट्य परिषद