आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पहिलीच वुमन्स वाॅकेथाॅन; महिलांच्या उत्साहाला उधाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरगुती कामे, नवऱ्याचा डबा, मुलांची तयारी अशा कामांत व्यस्त असलेल्या नाशिकमधील महिलांसाठी रविवारची (दि. ५) सकाळ अन्य दिवसांच्या तुलनेने अधिक फ्रेश ठरली. निमित्त हाेते वुमन्स वाॅकेथाॅनचे. अाराेग्याच्या दृष्टीने महिलांना सकाळी चालण्याची सवय जडावी, तसेच त्यातून पुढे त्यांच्या मॅरेथाॅनच्या वाटाही विस्तृत व्हाव्या या उद्देशाने साेनाली दाबक यांनी वेस्ट विंड मिडाेज येथे या वाॅकेथाॅनचे अायाेजन केले हाेते. नाशिककर महिलांनी हजाराेंच्या संख्येने सहभाग घेत अाराेग्य संवर्धनाबराेबरच ‘हम भी किसीसे कम नहीं’चा संदेश दिला. 
 
सकाळी ६.३० पासूनच वाॅकेथाॅनसाठी महिला जमायला सुरुवात झाली. काही वेळातच महिलांचे माेठे समूह-गट कार्यक्रमस्थळी येऊन पाेहाेचले. यात वैशिष्ट्यपूर्ण पेहराव केलेल्या महिलांचा सहभाग लक्षवेधी हाेता. काही ग्रुप्सने नऊवारी साडी, फेटा अशा मराठमाेळ्या रूपाला गाॅगल अाणि जाॅगिंग शूजची जाेड दिली हाेती. काही ग्रुप्स चक्क पऱ्यांच्या पेहरावात वाॅकेथाॅनमध्ये सहभागी झाल्या. स्वतंत्र अाेळख दिसावी म्हणून अनेक ग्रुप्सने ड्रेस काेडवर भर दिला हाेता. त्यानंतर ‘पाऊले चालती अाराेग्याची वाट’ अशा पद्धतीने वाॅकेथाॅन रंगले. 

पाेलिस उपायुक्त दत्ता कराळे यांनी झेंडा दाखवून वाॅकेथाॅनचा प्रारंभ केला. यावेळी राष्ट्रीय अॅथलिट ताई बामणे, माेनिका अाथरे, प्रशिक्षक विजेंद्रसिंग, माजी अामदार निशिगंधा माेगल, लाेकमतच्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर, किशाेर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलचे नाना सूर्यवंशी, सुशील बागड, मंगला बागड, सुनीता तळवलकर, शरण्या शेट्टी, प्राचार्या सुदीप्ता सरकार अादी उपस्थित हाेते. 

पाहुण्यांचे स्वागत साेनाली दाबक, श्रीपाद दाबक, नरेन अय्यर, सुजीत नायर, अजय बाेरा, उदय चांदाेरकर अादींनी केले. वाॅकनंतर झुंबा अाणि वाॅर्मअप घेण्यात अाला. यावेळी महिला मनसाेक्तपणे थिरकल्या. विविध बक्षिसांचे वितरणही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात अाले. परीक्षक म्हणून मुग्धा लेले, नीता नारंग, अदिती नाडगाैडा, डाॅ. श्वेता भिडे अाणि मृदुला बेळे यांनी काम पाहिले. धनलक्ष्मी पटवर्धन अाणि ऊर्जा मराठे यांनी सूत्रसंचालन केले. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...