आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजवरच्या सर्वच अायुक्तांकडून केले गेलेय दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ट्रॅफिक सेलची निर्मिती व्हावी म्हणून नाशिक फर्स्ट संस्थेने शासन अाणि महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला अाहे. गेल्या सहा वर्षांपासून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार शासनातील मंत्री अाणि महापालिकेच्या अायुक्तांशी भेट घेऊन चर्चा केली अाहे. परंतु, अाश्वासनांच्या पलीकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती फारसे काही पडले नाही. नियमांनुसार चालणारे अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळातही यावर विचार हाेऊ नये, हे विशेष.
शहरातील वाहतुकीची समस्या साेडविण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र ट्रॅफिक सेल असावा, अशी मागणी नाशिक फर्स्टच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून हाेत अाहे. तत्कालीन प्रधान सचिव टी. सी. बेंजामीन यांच्या पत्राचा या मागणीला अाधार अाहे. कायद्यातच ट्रॅफिक सेलची तरतूद असल्यामुळे अशा सेलला नाकारण्याची महापालिकेला गरजच नाही. असे असतानाही संजय खंदारे यांचा अपवाद वगळता अन्य सर्वच अायुक्तांनी या मागणीला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. पाणीपुरवठा, रस्ते अाणि दिवाबत्ती यांची व्यवस्था करण्याची मूलभूत जबाबदारी महापालिकेची असली तरीही त्या अनुषंगाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत कशी राहील याचीही जबाबदारी अापसूकपणे पालिकेवर येते. परंतु, सदर जबाबदारी केवळ वाहतूक विभागाची असल्याचे दर्शवित महापालिका प्रशासन या मुद्यापासून दूर पळू पाहत अाहे. परिणामत: शहरात वाहतूक काेंडीला नागरिकांना राेजच सामाेरे जावे लागत अाहे.

नाशिक फर्स्ट या संस्थेने अाजवर तत्कालीन अायुक्त भास्कर सानप, पी. वेलरासू, संजय खंदारे अाणि विद्यमान अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना ट्रॅफिक सेल कार्यान्वित करणे तत्सम विषयांबाबत वेळाेवेळी पत्रव्यवहार केला अाहे. यात कायद्याची माहिती देणे, शासनातील अधिकाऱ्यांबराेबर झालेल्या चर्चा, शासकीय अध्यादेश या सर्वच बाबींची माहिती वेळाेवेळी देण्यात अाली अाहे. परंतु, यात खंदारे वगळता सर्वच अायुक्तांनी विषयाकडे गांभीर्याने बघितलेच नाही. भास्कर सानप यांनी त्यांच्या कार्यकाळात ट्रॅफिक सेल कार्यान्वित करण्याचे अाश्वासन दिले. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी केलीच नाही. खंदारे यांनी मात्र सुरुवातीच्या काळात या सेलसाठी वाहतूक पाेलिस अाणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठका घेतल्या हाेत्या. परंतु, कालाैघात त्यांचाही उत्साह मावळला. त्यानंतर शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला हा ट्रॅफिक सेलचा मुद्दा दुर्लक्षितच झाला. त्याचबराेबर शासकीय पातळीवरदेखील नाशिक फर्स्टच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात अाला. प्रारंभी नगरविकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव टी. सी. बेंजामीन, मनीषा म्हैसकर, श्रीकांत सिंह अादी अधिकाऱ्यांनाही वारंवार स्मरणपत्र देण्यात अाले.