आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : पाऊस बेफाट... नद्या सुसाट, जिकडे तिकडे पाणीच पाणी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाषाढाच्या प्रारंभी केवळ झलक दाखवलेल्या वरुणराजाने अाठवडाभरानंतर खऱ्या अर्थाने लक्षधारांनी जलवर्षाव करीत नाशिकसह अासपासच्या परिसराला तृप्त करून टाकले. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर अाणि रविवारी जवळपास दिवसभर काेसळत राहिला. त्यामुळे गाेदापात्रात सकाळी ११ वाजेपासून पाण्याची पातळी वाढण्यास प्रारंभ हाेऊन दुपारी पर्यंत पुराच्या तीव्रतेचे प्रमाण मानला गेलेला दुताेंड्या मारुती मानेपर्यंत बुडाला हाेता.
दुपारीगंगाकाठावरील काही टपऱ्या, दुचाकी-चारचाकी गाड्या पाण्यात वाहून गेल्या. वाघाडीलादेखील सकाळपासूनच पूर अाल्याने ते सगळे पाणी अाठवडेबाजाराच्या टप्प्यात गाेदेत मिसळत असल्याने तिथून पुन्हा पाण्याची पातळी वाढत हाेती. शहरातील सर्वच सखल भागांमध्ये पाण्याची तळी निर्माण झाल्याने वाहतुकीला माेठा अडथळा निर्माण झाला. मात्र, मनसाेक्त काेसळलेल्या पावसाने येत्या वर्षातील पाण्याच्या मुबलकतेची शाश्वती वाटू लागल्याने अनेक नाशिककरांनी पावसाचा वेग कमी हाेताच रविवारच्या सुटीची संधी घेत पावसाचा मनसाेक्त अानंद लुटला.

शनिवारपासून पाऊस प्रामुख्याने गंगापूर अाणि दारणा धरणाच्या पाणलाेट क्षेत्रासह महानगराच्या संपूर्ण परिघात काेसळला. त्यामुळे नाशिकमध्ये पहिल्याच माेठ्या पावसाने गाेदावरीचे पात्र अाेसंडून वाहू लागल्याचे दिसून अाले. गाेदावरीला मिळणाऱ्या अनेक लहान-माेठ्या नद्या-नाल्यांनाही माेठ्या प्रमाणात पाणी अाल्याने दुपारी तीनच्या सुमारास घारपुरे घाट अाणि रामवाडी पुलाच्या तळापर्यंत पुराचे पाणी पाेहाेचले हाेते. नालेसफाई पूर्णपणे झाली नसल्याने शहराच्या बहुतांश सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली हाेती. सर्वाधिक पाणी राजीव गांधी भवन, कॅनडा काॅर्नर परिसर, मायकाे सर्कल परिसर, पाेलिस प्रबाेधिनी, सावरकर जलतरण तलाव, पंचवटीतील महालक्ष्मी थिएटर, तिडके काॅलनीतील हाॅटेल संदीपपासून साेपान हाॅस्पिटल या परिसरात साचून सायंकाळपर्यंत भागाला तलावांचे स्वरूप अाले हाेते. मायकाे सर्कल ते चांडक सर्कल रस्ता पूर्णपणे एकेरी करण्यात अाला हाेता. तसेच, गाेल्फ क्लबवर तर जणू तळे साचले हाेते.

रविवारकारंजा परिसरात वाडा कोसळला : रविवारकारंजा परिसरात असलेला एक जुना वाडा सततच्या पावसाने कोसळला. गोदावरी परिसरातील मोदकेश्वर मंदिराजवळील घर क्रमांक ११२० ची भिंत कोसळल्याने दोन जखमी झाले. येथील एसटी कॉलनी परिसरातील घरात पाणी घुसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. संसाराेपयोगी साहित्य हलविण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत होती.

ठिकठिकाणी वाहतूक काेंडी : संततधारपावसाचा परिणाम शहरातील अनेक भागातील वाहतूक व्यस्थेवरही झालेला बघावयास मिळाला. द्वारका, रविवार कारंजा, पंचवटी, एबीबी सर्कल, मायकाे सर्कल, वावरे चाैक, जुना गंगापूर नाक्यासारख्या परिसरात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एबीबी सर्कल, मायकाे सर्कल तसेच सावरकर तरण तलावासमाेरील परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करतच मार्गक्रमण करावे लागत होते. तिडके काॅलनीतील नासर्डीवरील पुलावरून काही काळ पाणी वाहत असल्याने गाेविंदनगरकडून तिडके काॅलनीकडे येणाऱ्या अनेक नागरिकांना पुन्हा माघारी फिरून मुंबई नाकामार्गे येण्याची कसरत करावी लागली.
हटवल्या टपऱ्या
गाेदाकाठाच्यादुतर्फा वर्षभर छाेट्या टपऱ्या थाटून मुक्काम ठाेकलेल्या टपरीचालकांनी दुपारी बारापासूनच अापापल्या टपऱ्यांमधील सामान काढून घेऊन टपऱ्या उंच स्थानावर नेण्यास प्रारंभ केला. नीळकंठेश्वर मंदिरानजीकच्या काही टपरीचालकांचे सामान पंचवटीकडील काही चालकांच्या टपऱ्याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. कपूरथळा परिसरातील चाैपाटीवरील विक्रेत्यांनाही त्यांचे सामान उचलण्यासाठी घाई करावी लागली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा नाशिक जिल्ह्यातील पावसातील फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...