आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आकार’मधून आविष्कार विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा; ‘आयएनआयएफडी’, अकॅडमी ऑफ इंटेरिअरतर्फे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कल्पकतेला कौशल्याची जोड देत विद्यार्थ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साकारलेल्या वस्तूंचा नावीन्यपूर्ण ‘आकार’ पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.कॉलेजरोड येथील आयएनआयएफडी अकॅडमी ऑफ इंटेरिअर यांच्या वतीने ‘आकार-२०१७’ या वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, मे रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझाइनचे अध्यक्ष आर्किटेक्ट हेमंत दुग्गड यांच्या हस्ते होणार आहे. 
 
मॉडेल कॉलनी येथील मुक्तांगण अपार्टमेंट येथे हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. यात प्रथम ते तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कल्पक वस्तूंची मांडणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून एक महिनाभर ते खुले राहणार आहे. इंटेरिअर डिझायनिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे संचालक सूरजितसिंग मनचंदा यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...