आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेडगावला थंडीने एकाचा बळी, नाशकात पारा 6, निफाडला 4 वर; राज्यातील नीचांकी तपमानाची नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक / निफाड / वणी - देशाच्या उत्तर तसेच वायव्य भागात पश्चिमी चक्रावात सक्रिय राहिल्याने जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला अाहे. जिल्ह्यात सातत्याने पारा घसरत असून कडाक्याच्या थंडीने खेडगाव (ता. दिंडोरी) शिवारात एकाचा बळी घेतला आहे. बुधवारी रात्री दिंडोरीत पारा अंशांपर्यंत घसरल्याने जितेंद्र निंबा वाघमारे (वय ४०, चंदनापुरी, ता. संगमनेर) यांचा मध्यरात्री कुडकुडून मृत्यू झाल्याची नोंद वणी पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र बागुल यांनी व्यक्त केला. ओळख पटवून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस हवालदार रमेश पवार तपास करत आहेत.
 
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग ताशी ते किलोमीटर असल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. नाशिकमध्ये गुरुवारी किमान अंश सेल्सिअस तर निफाडमधील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर राज्यातील सर्वात नीचांकी अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली. निफाड तालुक्यात थंडीचा जोर कायमअसून, गुरुवारी हंगामातील आतापर्यंत सर्वात कमी तपमानाची नोंद करण्यात आली. थंडीमुळे सकाळी तसेच सायंकाळनंतर शेकोट्या पेटू लागल्या आहेत. हवेत प्रचंड गारवा असल्याने दिवसभर हुडहुडी जाणवत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात द्राक्ष हंगाम चांगला आला असून, वाढत्या थंडीने घडांची फुगवण थांबणार अाहे. द्राक्षमण्यांमध्ये साखर उतरण्यास विलंब होणार आहे. थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने करपणे, झाडांच्या मुळ्या सुकणे आदी प्रकार होण्याचा धोका वाढल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. द्राक्षबागेत चिपाटे पेटवून धुराडे केले जात आहेत. वाढत्या थंडीमुळे द्राक्षांना पहाटेच ड्रीपद्वारे पाणी द्यावे लागत अाहे. वाढती थंडी गहू, हरभरा, कांदा पिकांना लाभदायक असली तरी पारा आणखी घसरल्यास ही पिकेही धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. थंडीची ही तीव्रता आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. 
 
राज्य थंडीने गारठले 
देशाच्या उत्तरेकडील भागात बर्फ‌वृष्टी सुरू अाहे. त्या भागातून राज्याकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा विदर्भ गारठला आहे. मराठवाड्यात परभणी येथे अंश तापमान नोंदण्यात आले. विदर्भात नागपुरात पारा ८.६ अंशांपर्यंत घसरला. नागपुरातील हे चार वर्षांचे नीचांकी तापमान आहे. पश्चिम विदर्भासह, मराठवाडा उत्तर-मध्य महाराष्ट्रात आणखी दोन दिवस थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.