आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका करणार जैविक साधन संपत्तीचे संवर्धन, महासभेची मंजूरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील दुर्मिळ जैवविविधता नष्ट होत असल्याने चिंता व्यक्त केली जात अाहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या जैवविविधता कायद्यानुसार महापालिका स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समितीची (बायोडायव्हर्सिटी कमिटी) स्थापना करण्यास महासभेची मंजूरी मिळाली आहे. 
 
जैविक साधन संपत्तीचेसंवर्धन करणे, ही काळाची गरज बनली आहे. स्थानिक जैविक विविधतेतून प्राप्त होणारी माहिती नोंदी ठेवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत नुकतीच जैव विविधता समितीची स्थापना करण्यात अाली अाहे. जैविक साधन संपत्ती माहिती, त्यांचा औषधी इतर कोणताही उपयोग, त्या जैवविविधतेचे पारंपरिक ज्ञानाची व्यापक माहिती संकलित करण्याचे काम या समितीचे आहे. त्याशिवाय चुकीचे पेटंट फाइल करण्यास प्रतिबंध करणे, स्थानिक लोकांच्या पारंपारिक ज्ञानाची जैवविविधता कायद्यानुसार नोंद ठेवणे, जैवविविधता संरक्षण करणे, जैवविविधतेचे व्यावसायिक वापराचे नियमन करणे, जैवविविधतेच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्याचे समन्यायी पध्दतीने वाटप करणे, तसेच, जीवशास्त्रीय जैविक साधनसंपत्ती असलेल्या जागी प्रवेश मान्यता देण्यात आलेली पारंपारिक माहितीचा तपशिलाच्या नोंदी वहीत ठेवण्याचे काम आहे. 
 
समितीचे सदस्यांचे कामकाज सेवा 
परिसरातील जैवसंपत्तीचे संवर्धन आणि शाश्वत वापर, जैवविविधता व्यवस्थापन समितीची बैठकी घेणे, जैवविविधता व्यवस्थापन समितीसाठी महापालिका अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करुन घेणे, परिसरातील नैसर्गिक अधिवासांची नोंद आणि जतन, पाळीव पशुधन आणि अन्य प्राणिसंपदेची नोंद ठेवणे, स्थानिक वाणांची नोंद आणि संवर्धन राज्य जैवविविधता मंडळ केंद्रीय जैवविविधता मंडळाकडून निधी उपलब्ध करुन घेणे ही काम सदस्यांची अाहेत. 

{ निसर्गातील हस्तक्षेपामुळे होणाऱ्या परिणामांची पूर्वकल्पना. 
{ निसर्गात होणाऱ्या घातक हस्तक्षेपांवर नजर. 
{ पालिकेच्या नगररचना विभागाला विविध विषयांत तज्ज्ञांचे मार्गदर्शन. 
{ पालिकेच्या शिफारशीवर राज्य मंडळ नवी वारसास्थळे घोषित करू शकते. 
{ केंद्रीय प्राधिकरणाशी सल्लामसलत करून वारसास्थळांसाठी नियमावली शक्य. 
{ जैवसमृद्ध स्थळ जोपासताना कोणी विस्थापित होत असेल तर पुनर्वसनासाठी निधी. 

सात सदस्यांची समिती 
जैवविविधता व्यवस्थापन समितीवर महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांमधून सहा सदस्य अाणि एक प्रशासनातील अधिकारी यांची निवड करण्यात येणार अाहे. त्यात सहा नगरसेवकांमध्ये दाेन जागा महिलांसाठी दाेन जागा एस. सी. एसटी सदस्यांसाठी अारक्षित अाहे. सदर समितीचा कार्यकाल पाच वर्षासाठी असणार अाहे.
 
तरउपलब्ध हाेईल निधी 
राज्य जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून केंद्रीय जैवविविधता प्राधिकरणाशी सर्व समित्या जोडल्या जाऊन एक साखळी तयार होणे अभिप्रेत आहे. यासाठी आराखडे तयार केल्यास जैवसंपदेच्या जतनासाठी निधीही उपलब्ध होऊ शकतो. 
बातम्या आणखी आहेत...