आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालांत परीक्षेचा निकाल सुधारण्यासाठी नव्याने प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आलेल्या नव्या तरतुदींनुसार आता माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (एचएससी) च्या उत्तीर्णतेचे प्रमाण सुधार योजना सुरू केली जाणार आहे. या अंतर्गत नापास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची वेगळी पद्धत अवलंबली जाईल. ज्यात शिक्षक विद्यार्थी संवाद आणि विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण कायम राखण्यावर भर दिला जाणार अाहे.
शिक्षण मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या जीआरनुसार नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बोर्ड परीक्षेशी साधर्म असणाऱ्या असतील. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी होणार आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी वेगळी शाळा चालवण्याची संकल्पना या नव्या तरतुदींमध्ये अाहे. गुणवत्तेने कमी असणारे विद्यार्थी हेरून त्यांना विशेष शिक्षणाद्वारे उत्तीर्ण करून घेण्याची जबाबदारी असेल. मुख्यत्वे अाठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना हे लागू होईल. विद्यार्थी शिक्षकांमध्ये जास्त संवाद घडवून आणला जाईल. शिक्षकांसाठी या विद्यार्थ्यांना वेगळे शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल.

शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जाईल. अाठवी, नववीसाठी ही योजना लागू केली जाईल. देश पातळीवर महाराष्ट्राचे बोर्ड परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी ही योजना तयार केली जाणार आहे.

आज राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन
या नव्या जीआरची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी करावी, याविषयी चर्चा करण्यासाठी काही निवडक व्यक्तींची मुंबई येथे गुरुवारी (दि. २२) राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये समाविष्ट अनुभवी शिक्षणविषयक अभ्यासकांशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरविल्या जाणार आहेत. नेमकी कधीपासून या नव्या पद्धतीची तयारी आणि अंमलबजावणी करायची याबाबतचे नियोजनही या बैठकीत होईल.

नववीतील नापासांची जुलैत फेरपरीक्षा
^दहावी आणि पर्यायाने बारावी निकालांची गुणवत्ता वाढावी म्हणून नववीमध्ये शाळांचे निकाल कमी लागत असत. असे होता येत्या वर्षापासून नववीच्या नापास विद्यार्थ्यांची जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालांवर चांगला परिणाम होईल. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्यस्तरावर अनुभवी शिक्षकांत चर्चा घडवली जाणार आहे. -नवनाथ अौताडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
बातम्या आणखी आहेत...