आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट’ नाही, पुन्हा कागदी अार.सी. बुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची आरटीओकडे नोंदणी होते. या वाहनांना आरटीओ कार्यालयामार्फत पूर्वी कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात आर.सी. बुक दिले जात होते. मात्र, ते सांभाळणे जिकिरीचे होते. कारण ते जीर्ण हाेण्याचा, फाटण्याचा धाेका अधिक हाेता. तंत्रज्ञानातील अावश्यक बदल ओळखून परिवहन विभागाने २००६ मध्ये एका खासगी कंपनीला आर.सी. बुक स्मार्टकार्डच्या स्वरूपात तयार करून देण्याचे कंत्राट दिले. मात्र, स्मार्टकार्डचे हे कंत्राट संपल्यानंतर वाहनधारकांना स्मार्टकार्ड वितरित हाेणे बंद करण्यात अाले. यानंतर पुन्हा काही दिवस कागदावर छापील स्वरूपात आर.सी. बुक वितरण सुरू करण्यात आले. मात्र, छापील स्वरूपातील हे कागदी अार.सी. बुक तयार करण्यासाठी आरटीआे विभागाकडे कागददेखील उपलब्ध झाला नसल्याने आरटीआे कार्यालयातील वाहन नोंदणी रखडली आहे. परिणामी, अनेक विभागांत अार. सी. बुक वितरण ठप्प झाले अाहे. अाजघडीला राज्यातील सुमारे सहा लाख वाहनधारकांना आर.सी. बुक वितरण झाले नसल्याचे समजते.
कर्जाचे हस्तांतर आरसी बुकअभावी रखडले...
स्मार्टकार्डचा करार संपल्यानंतर राज्यभरातील अारटीअाे कार्यालयांकडून साधारणतः काही दिवस सुरळीतपणे कागदावर छापील स्वरूपात आरसी बुक वितरित करण्यात आले हाेते. मात्र, छापील स्वरूपातील पुस्तके देण्यासाठी कागदाचादेखील आरटीआे विभागाकडे तुटवडा भासल्याने अाजघडीला आरटीआे कार्यालयातील वाहन नोंदणी रखडली अाहे. वाहनांच्या विक्रीनंतर त्या वाहनांचे हस्तांतर, घेतलेल्या कर्जाचे हस्तांतरदेखील आरसी बुकअभावी रखडले असल्याची माहिती ‘डी. बी. स्टार’च्या तपासात समाेर अाली अाहे.

जिल्ह्यातही ‘स्मार्ट आरसी बुक’ची प्रतीक्षाच...
जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार वाहनधारकांचे आरसी बुक वितरितच झालेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी स्मार्ट कार्ड बनविणाऱ्या एजन्सीचा ठेका संपल्यापासून संपूर्ण राज्यातच अारसी बुक देण्याचे कामे थांबले अाहे. त्याचा फटका माेठ्या संख्येने वाहनधारकांना बसत आहे. नाशिक विभागाने कागदी पुस्तिका वाटप करण्याचा निर्णय घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला अाहे.

वाहन विक्रेत्यांकडून मात्र वसुली सुरूच
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर काही वाहन विक्रेत्यांकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नावाखाली दहा ते पंधरा हजार रुपये ग्राहकांकडून अतिरिक्त स्वरूपात घेतले जातात. तर, काही जणांकडून अारसी बुक फी म्हणूनही शुल्क घेत ग्राहकांची लूट केली जाते. अारसी बुक स्मार्ट कार्ड पद्धतीत हवे असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारीदेखील ‘डी. बी. स्टार’कडे अाल्या अाहेत.

भार वाढल्याने पुन्हा विलंबाची चिन्हे
राज्यभरातीलआरटीओ कार्यालयांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा अाहे. दिवसाकाठी एका कार्यालयात सुमारे १५ ते २० आर.सी. बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात तयार होणार असल्याने रखडलेल्या आर.सी. बुकचा आकडा अाता आणखीनच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
स्मार्टकार्डचा ठेका संपल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून अाता पुन्हा जुनाट पद्धतीने अशाप्रकारे कागदी अार.सी. बुकचेच वितरण केले जात अाहे. त्यामुळे वाहनधारकांची पुन्हा गैरसाेय हाेत अाहे.
थेट प्रश्न
वाहन खरेदी केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक असते. मात्र, नोंदणीसाठी आवश्यक आर. सी. बुकसाठी राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये कागदच उपलब्ध नसल्यामुळे गेल्या १७ फेब्रुवारीपासून राज्यभरातील लाखाे वाहनांची नोंदणीप्रक्रिया रखडल्याची बाब ‘िदव्य मराठी’ने उजेडात अाणली हाेती. यानंतर नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने स्मार्टकार्डएेवजी तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा कागदी अारसी बुक वितरण सुरू केले असल्याची बाब ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. परिणामी, अत्याधुनिकतेच्या स्पर्धेत अपयशी ठरत असलेल्या विभागाला पुन्हा जुनाट पद्धतीचाच स्वीकार करावा लागत असल्याचे दिसून येत अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक स्थिती; १७ फेब्रुवारीपासून राज्यातही लाखाे वाहनधारकांना ‘स्मार्ट अार.सी. बुक’ची प्रतीक्षाच, प्रादेशिक परिवहन विभागाकडून अपुरी साधनसामुग्री तसेच ‘स्मार्ट’चा ठेका संपल्यामुळे पुन्हा जुनाट पद्धतीनेच केले जातेय वितरण
{गेल्या काहीमहिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो वाहनधारकांना स्मार्ट आर.सी. बुक मिळालेले नाही, काय कारण?
-स्मार्टकार्डचा ठेका संपलेला आहे. त्यामुळे नवीन स्मार्ट कार्ड बनविण्याची कामे रखडलेली आहेत.

{आरटीआे कार्यालयामार्फतवाहनधारकांना दिल्या जाणाऱ्या आर.सी. बुकचे वितरण पूर्णपणे बंद आहे का?
-स्मार्टकार्डचे काम बंद असले तरी कागदी आर.सी. बुक देण्यास अाता सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा वितरण सुरू केेले आहे.

{नवीन वाहनधारकांनाआता स्मार्ट आर.सी. बुक कधी मिळू शकतील?
-आरटीआे कार्यालय कागदी आर.सी. बुक देत आहे. स्मार्टकार्ड कधी मिळतील, याबाबत माहिती घ्यावी लागेल.
पावती देऊन वाहन नोंदणी...
वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसीबुक) हे स्मार्ट कार्डच्या स्वरूपात देणे बंद झाल्याने जुन्या पुस्तिकांचे वाटप केले गेले. मात्र, त्याही पुस्तिका संपल्या असून, नव्या पुस्तिका छापण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे आरसी बुक आता नेमके कोणत्या स्वरूपात दिले जाणार आहे, याबाबत खुद्द आरटीआे कार्यालयाकडेही ठाेस माहिती नाही. सध्या आरटीआे कार्यालयामार्फत वाहनधारकांना एक पावती दिली जात असून, त्यावर आरटीआे कार्यालयाचा शिक्का आहे. हा शिक्का पाहून पोलिसांना वाहन सोडण्याबाबत सूचना आरटीआे विभागाकडून देण्यात अाल्या अाहेत.

पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
आरसी बुक वितरणाची कामे बंद असल्यामुळे वाहन तपासणी मोहिमेत आरसी बुकअभावी वाहनधारकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून अाले आहे. अारटीअाेच्या चुकीचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत असल्याचे संताप व्यक्त केला जात अाहे. अारटीअाेने तातडीने स्मार्टकार्ड वितरण सुरू करावे, अशी मागणीही वाहनधारकांकडून केली जात अाहे.

वाहनाचेअार.सी. बुक, कागदपत्रेे दाखवा... तपासणी करावयाची अाहे...
अशी आहे आकडेवारी...

{१७ फेब्रुवारीपासून राज्यातील सहा लाख वाहनांचे आर.सी. बुक रखडले; जिल्ह्यातील अाकडाही ४५ हजारांवर
{ राज्यभरात ५० प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालये; सव्वा लाख वाहनांची राज्यात दर महिन्याला केली जाते नोंदणी
बातम्या आणखी आहेत...