आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : शाळा म्हणते... टेन्शन घेऊ नका, केंब्रिज शाळेकडून पालकांना मिळाले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नेव्हीत काम करणाऱ्या माणसाचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या अात. जरा अाश्चर्य वाटेल. पण असा अजब उत्पन्नाचा दाखला केंब्रिज शाळेनेच तयार करून या पालकाला शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेशही दिला असल्याचे यासंदर्भात सुरू असलेल्या चाैकशीत उघड झाल्याने चाैकशी अधिकाऱ्यांच्याच भुवया उंचावल्या अाहेत. दरम्यान याबाबत पालकाने विचारणा केली असता ‘तुम्ही टेन्शन घेऊ नका’ असा सल्लाही शाळेने दिल्याचे पालकाने सांगितले. 
 
शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शहरातील केंब्रिज शाळेने मात्र हा अादेश धुडकावत या राखीव जागांवर श्रीमंतांच्या मुलांना प्रवेश दिल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर अाता या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून सुरू असलेली चाैकशी मंगळवारी (दि. २३) पूर्ण झाली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ५८ प्रवेश संशयास्पद सापडले. यासंदर्भात शाळेकडून खुलासा मागितला असता केवळ १६ विद्यार्थ्यांचे कागदपत्रे सादर झाली. त्यातही अनेक त्रुटी अाढळल्या. विशेष म्हणजे, यापैकीच एका विद्यार्थ्याचे पालक नेव्हीत असतानाही त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतच असल्याचा अजब खुलासा शाळा प्रशासनाने केला. तर ते पालक मात्र मी नेव्हीत असल्याचे पुन्हा-पुन्हा सांगत अाहेत. यामुळे अाता संशयास्पद सर्वच प्रकरणातील सर्व कागदपत्रे चौकशी समितीने मागितली असून, ती जमा करण्यासाठी शाळेने तीन दिवसांची मुदत मागितली अाहे. 
 
शाळेला तीन दिवसांची मुदत दिली.. 
- चौकशीत अनेक कागदपत्रांत त्रुटी आढळून आलेल्या असून, शाळेला सर्व कागदपत्र सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस देण्यात आलेले आहेत. यानंतर लगेचच शासनाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा 
 
शाळेनेच बनविले बोगस उत्पन्नाचे दाखले 
‘दिव्य मराठी’ने केंब्रिज शाळेतील काही पालकांशी संपर्क साधला असता आम्हाला शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. अचानक शाळेतून फोन आला की, तुमच्या मुलाचा नंबर शिक्षणहक्कात लागला आहे. शाळेत गेल्यानंतर एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला बनविण्यासाठी ५०० रुपये घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, मी मर्चंट नेव्हीत, मला काय गरज..गौरव नाशिककर, पालक, केंब्रिज शाळा... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...