आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेंगाळलेल्या उद्यान प्रक्रियेला अखेर मुहूर्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - दोन वर्षांपासून नाशिकरोडकरांना ज्या उद्यानाचे आश्वासन दिले होते अखेर त्या उद्यानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे आश्वासन खरे होणार असल्याने नाशिकरोडकरांना एक आनंद निर्माण झाला आहे. जेलरोड येथील पंचक शिवारातील साडेआठ एकर क्षेत्रावर महापालिकेच्या वतीने अमृत अभियान योजनेंतर्गत वनोद्यान विकसित करण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी ९९ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने इ-टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.
नाशिकराेडच्या जेलरोड येथे पंचक शिवारात म्हैसूर येथील प्रसिद्ध अशा वृंदावन गार्डनच्या धर्तीवर वनोद्यान विकसित करण्यासाठी तत्कालीन नगरसेवक प्रकाश बोराडे यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, मात्र अद्यापही उद्यान विकसित झाले नव्हते.

अखेर महापालिकेने अमृत अभियानांतर्गत हे उद्यान विकसित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकारकडून २५ टक्के राज्य, तर २५ टक्के निधी महापालिका देणार आहे. त्यासाठी महापालिकेने हे उद्यान विकसित करण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
नाशिक - घरपट्टीपाणीपट्टी वसुलीसाठी अाक्रमक झालेल्या महापालिका प्रशासनास निवडणूक कामाकडे कर्मचारी वर्ग करणे अपरिहार्य ठरल्यामुळे घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्तीच्या माेहिमेला सुरुवात हाेत नाही ताेच सुरुंग लागला अाहे. कर विभागातील कर्मचाऱ्यांनी मतदार यादी विभाजनाच्या कामासाठी वर्ग केल्यामुळे जप्तीची माेहीम गुंडाळली गेल्याचे वृत्त अाहे.
हजार पाचशे रुपयांच्या नाेटा स्वीकारण्यास परवानगी दिल्याने घरपट्टी पाणीपट्टी विभागाचा हुरूप वाढला अाहे. १० ते १७ नोव्हेंबर या दरम्यान घरपट्टीपोटी १० कोटी ८८ लाख, तर पाणीपट्टीपोटी कोटी ४७ लाख जमा झाले. दरम्यान, करभरणा केंद्रांवर पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारण्याची मुदत पुन्हा २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. दुसरीकडे कर भरणा केंद्रावरील गर्दी कमी हाेत अाहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांवर अालेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या अशा मतदार यादी विभाजनाच्या कामास वर्ग केले अाहे. विधानसभानिहाय मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करण्याच्या कामासाठी करवसुली विभागातील अधीक्षक, सहायक अधीक्षक, लिपिक तसेच वसुली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

सातत्याने पाठपुरावा
^या उद्यानासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला असून, अखेर त्याला यश मिळाले. त्यामुळे जेलरोडवासीयांसाठी एक सुंदर उद्यान तयार होणार आहे. -रंजना बोराडे, नगरसेविका
वैशिष्ट्यपूर्ण उद्यान

^जेलरोडलाएवढ्यामोठ्या जागेवर उद्यान झाल्यानंतर एक वैशिष्ट्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक आरोग्यदायी उद्यानाचा लाभहोईल. - अशोक सातभाई, नगरसेवक

तिघांनी भरली थकबाकी
घरपट्टीच्याबड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्तीचे वॉरंट बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली अाहे. उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सिडकाे विभागातील पाच थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले होते. त्यापैकी तिघा थकबाकीदारांनी थकीत करांचा भरणा केला तर दाेघांच्या मिळकती जप्ती वॉरंट बजावले. याव्यतिरिक्त सातपूर ७, सिडकाे ६, नाशिकराेड ९, तर नाशिक पश्चिममधील थकबाकीदारांच्या मिळकती जप्ती वॉरंट बजावण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...