आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७० विहिरीे पुनर्जीवित करण्यासाठी प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नैसर्गिकजल स्रोतांचे जतन करणे अाणि बंद जलस्रोत पुनर्जीवित करण्यासाठी नाशिक एज्युकेशन साेसायटी अाणि भारतीय जलसंस्कृती मंडळाने केलेल्या अावाहनास चांगला प्रतिसाद देत नाशिककरांनी तब्बल ७० विहिरी पुनर्जीवित करण्याचे प्रस्ताव संस्थेकडे दिले अाहेत. अपेक्षेपेक्षा अधिक प्रस्ताव अाल्याने पालिकेने अाता या कामाला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. विहिरीतील गाळ साफ करणारे यंत्र अाणि वाहनांची व्यवस्था पालिकेने केल्यास शहरातील पाणीटंचाईची झळ कमी हाेणे शक्य अाहे, असे संस्थेचे म्हणणे आहे.
‘नाएसो’ अाणि भारतीय जलसंस्कृती मंडळाने जलजागृतीचे काम गेल्या तेरा वर्षांपासून हाती घेतले अाहे. संस्थेने जलस्रोतांबाबतही जागृती सुरू केली अाहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या प्रयत्नातून तीन बंद विहिरी खुल्या झाल्या अाहेत. त्यांच्या पाण्याने शहरातील दुष्काळावर मात करता येईल, या विचारातून त्यांनी जुने नाशिक परिसरातील काशीकर गायधनी वाड्यातील बुजलेली विहीर अवघ्या १५ हजारांत खुली करून दाखविली. त्यात अाता भरपूर पाणी अाहे. याशिवाय, भगूर अाणि वेळुंजे येथील विहिरीतील जलस्रोत जिवंत केले. जलदिनानिमित्त संस्थेने शिक्षण संस्थाचालक अाणि जलप्रेमींची बैठक घेतली. त्यात शहरातील जलस्रोत पुनर्जीवित करण्याची जबाबदारी संस्थेने घेतली. कालिका मंदिर अाणि उंटवाडीतील पाटील मळ्यातील विहिरींचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही माजी नगरसेवक केशव अण्णा पाटील यांनी दिली, तर नाशिकराेड परिसरातील गायकवाड मळ्यातील विहिरी पुनर्जीवित करून खुल्या करणार असल्याचे माजी सभागृहनेते त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितले. जुन्या वापरात नसलेल्या विहिरींची माहिती कळविण्याच्या ‘दिव्य मराठी’तून केलेल्या अावाहनास भरभरून प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ७० विहिरी पुनर्जीवित करण्याचे प्रस्ताव संस्थेला प्राप्त झाले. त्यातील टाकळी ट्रस्टची विहीर प्रथम पुनर्जीवित करून उर्वरित विहिरींसाठी पालिकेने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पालिकेच्या पुढाकाराने ७० भागांना मिळेल पाणी : दुष्काळी स्थितीत बुजलेल्या विहिरी खुल्या करण्याची जबाबदारी पालक संस्था म्हणून पालिकेची अाहे. भारतीय जलसंस्कृती मंडळाने सामाजिक भान राखत हे काम हाती घेतले असले तरीही साधनसामग्रीचा अभाव अाणि अालेले प्रस्ताव हे बघता पालिकेनेच मंडळाचे काम पुढे घेऊन जाण्याची गरज अाहे. शहरातील ७० विहिरी पुनर्जीवित झाल्यास तब्बल ७० भागांना पाणीपुरवठा हाेणार अाहे.

जलस्रोत पुनर्जीवित करण्यासाठी संपर्क साधा
विविधजलस्रोत, विशेषत: जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ अाणि जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेतला अाहे. काेणाला बंद विहिरी खुल्या करावयाच्या असल्यास त्यांनी राजेंद्र निकम (९४२२२८३४३८) किंवा दिलीप अहिरे (९४२०५९४३३१) यांच्याशी संपर्क साधावा.