आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सावाना’ कार्यवाह, अर्थसचिव अध्यक्षांकडून पदच्युत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्येच नव्हे, तर महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीत महत्त्वाचे स्थान असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या १७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांना अापल्याच कार्यकारी मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर काम थांबविण्याची कारवाई करत त्यांना पदच्युत करण्याची वेळ अाली अाणि साहित्यक्षेत्र ढवळून निघाले. मनमानी कारभार, कार्यकारी मंडळाला जुमानणे, अध्यक्षांचा अवमान करणे, हुकूमशाही पद्धतीची वागणूक... असे अाराेप ठेवत अध्यक्ष विलास अाैरंगाबादकर यांनी कार्यवाह मिलिंद जहागिरदार, अर्थसचिव स्वानंद बेदरकर अाणि कार्याध्यक्षा विनया केळकर यांना तत्काळ कामकाज थांबविण्याचे अादेशच दिल्याने साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात चर्चेला उधाण अाले अाहे.
‘सावाना’चा लाैकिक पावणेदाेनशे वर्षांच्या काळात उत्तराेत्तर वाढला तरी गेल्या काही दिवसांपासून विद्यमान कार्यकारी मंडळातील अंतर्गत धुसफुशीने कळस गाठला हाेता. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी धक्कातंत्राचा वापर करत संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला.
संस्थेच्या घटनेतील नियमांचे उल्लंघन करत अार्थिक सामाजिक नुकसान हाेईल असे काम केल्याचे अाढळून अाल्याने हा कठाेर निर्णय घेत असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. तसेच, या तीनही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कार्यकारी मंडळ सदस्य तसेच पदाचे कामकाज पुढील सूचना देईपर्यंत थांबवून ठेवण्याचे अादेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षपद हे शाेभेचे असल्याचे बाेलले जात असले तरी हा निर्णय घेताना मात्र ते कागदपत्र, घटनेतील कलमांसह अत्यंत तयारीत सगळ्यांना सामाेरे गेल्याचेही पाहायला मिळाले. वाचनालयाच्या घटनेतील कलम २२/५ प्रमाणे अध्यक्षांना असलेल्या अधिकारानुसार ही कारवाईची नाेटीस साेमवारी बजावण्यात अाली अाहे. ती सभासदांच्या माहितीसाठी बाेर्डावरही लावण्यात अाली असून, संस्थेची खाती असलेल्या बँकांनाही त्याची माहिती देण्यात अाली अाहे. घटनेतील नियम-उपनियमांचे उल्लंघन करीत असल्याबाबतची कारणे दाखवा नाेटीस अध्यक्षांनी या तीनही पदाधिकाऱ्यांना अाॅक्टाेबर राेजी बजावून दिवसांत संबंधितांना खुलासा करण्यासाठी मुदत दिली हाेती. त्यात कार्यवाह जहागिरदार यांच्याकडून ३७, केळकर यांच्याकडून २६, तर बेदरकर यांच्याकडून १३ बाबींचा खुलासा मागितला हाेता. पण, दिलेल्या मुदतीत त्यांनी काहीही खुलासा केल्याने हा बडगा उगारावा लागल्याचे अाैरंगाबादकर यांनी सांगितले. या तीनही पदाधिकाऱ्यांनी काेणत्या बाबींचा खुलासा करावा, याची एक माेठी यादीच यावेळी अध्यक्षांनी सादर केली.

बातम्या आणखी आहेत...