आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"तालमीचा हॉल' मध्ये रंगकर्मी आले एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आयुष्यातील खडतर प्रवास हा एक जणू रंगमंचावरील कलाकृतीप्रमाणेच घडताे. कलाकारांनी सादर केलेल्या घटना जीवन प्रवास उलगडत अंतर्मुख करायलाही भाग पाडतात. नाटकातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यातील घटना, भावभावनांचे दर्शन अतिशय लक्षवेधक पद्धतीने मांडते अन् उलगडत जातो"तालमीचा हॉल'...
सार्वजनिक वाचनालयाच्या १७५व्या वर्षानिमित्त प. सा. नाट्ययज्ञ हा उपक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आला होता. यात शहरातील एका नाट्यसंस्थेकडून दर महिन्याला नाटक सादर केले जात होते. प. सा. नाट्यगृहात नाट्ययज्ञाच्या समारोपात याच विविध नाट्यसंस्थांमधील कलावंतांना एकत्र आणण्याचा अभिनव उपक्रम सावानाने केला.

सुरेश गायधनी यांची संकल्पना असलेल्या दत्ता पाटील लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. विनोद राठोड (प्रकाशयोजना), राहुल गायकवाड, देव चक्रवर्ती (नेपथ्य), केदार-आनंद (संगीत), माणिक कानडे रेश्मा कानडे (रंगभूषा), श्रद्धा देशपांडे (वेशभूषा), लक्ष्मण कोकणे ईश्वर जगताप यांचे निर्मिती साहाय्य होते.

यांनी साकारल्या भूमिका
नाटकामध्ये २४ कलावंतांनी भूमिका सादर केल्या. त्यात प्रशांत हिरे, धनंजय वाबळे, प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, कुंतक गायधनी, पीयूष नाशिककर, प्रतीक शर्मा, स्वरूप बागुल, राजा पत्की, अमित देवडे, कीर्ती भवाळकर, लक्ष्मी पिंंपळे, पल्लवी पटवर्धन, सई आपटे, दर्शना करहू, स्वराली हरदास, डॉ. शिल्पा दयानंद, श्रृती चांदोरकर, डॉ. मोहन आमेसर, पूर्वा सावजी, प्रचिती भावे, निहारिका देशपांडे, क्षमा देशपांडे, विशाखा अस्वले यांचा मुख्यत्वे समावेश हाेता.
बातम्या आणखी आहेत...