आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावाना पदच्युत पदाधिकाऱ्यांवर १७ लाखांच्या भ्रष्टाचाराचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक वाचनालयाच्या तत्कालीन पदच्युत कार्याध्यक्षा प्रा. विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांच्यावर नूतनीकरणाच्या कामात तब्बल १७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा अाराेप ठेवत त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याबराेबरच त्यांच्यावर दिवाणी अाणि फाैजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव सावानाच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात अाला. 
 
सार्वजनिक वाचनालयाच्या २९ जानेवारीला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केळकर, जहागिरदार अाणि बेदरकर यांच्या कामकाजावर ठपका ठेवत माेठा गाेंधळ झाला हाेता. त्याचवेळी या तिघांच्या काळात नूतनीकरण केलेल्या कामांची कामनिहाय तपासणी गव्हर्मेंट अॅप्रूव्हड् व्हॅल्युअर अार्किटेक्टमार्फत करावी, असा ठराव मंजूर करण्यात अाला हाेता. त्यानुसार अार्किटेक्ट अनिल चाेरडिया यांची नियुक्ती करण्यात अाली. त्यांनी २८ फेब्रुवारीला या संदर्भातील अहवाल सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास अाैरंगाबादकर यांना सादर केला. या अहवालातील अभ्यासानुसार वाचनालय परिसरात विविध ठिकाणी करण्यात अालेल्या कामात अनियमितता अाढळल्याने, तसेच विविध कामांमध्ये १६ लाख ८३ हजार ९१६ (अधिक कर) रुपयांचा गैरव्यवहार दिसून अाल्याचे नमूद असल्याने या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे अाराेप ठेवत त्यांच्यावर दिवाणी फाैजदारी गुन्हे नाेंदविण्याच्या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात अाली. या गैरव्यवहारात फॅब्रिकेशन वर्क, रंगकाम सुतारकाम प्लायवूड या खर्चांचा समावेश अाहे. 

रंगकामावरील जादा खर्चामुळे झालेले नुकसान 
मटेरियलची एकूण किंमत : ४२१५६०/-
३५ टक्के मजुरी द्यायला हवी हाती - १४७५४६
बिलातमागणी केलेल्या ५८८११३ पैकी प्रत्यक्षात दिलेली मजुरी - ५६२४००
मजुरीपाेटीजादा दिलेली रक्कम- ४१४८५४ 
 
...म्हणून झाली रविवारी सभा 
सार्वजनिक वाचनालयाची विद्यमान कार्यकारिणी मार्च २०१२ राेजी अस्तित्वात अाली हाेती. त्यानुसार मार्च २०१७ राेजी या कार्यकारिणीला पाच वर्षे पूर्ण हाेतात. घटनेनुसार कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काेणत्याही निर्णयांचा अधिकार कार्यकारिणीला अधिकार राहात नाही. काेणतेही धाेरणात्मक निर्णय वा कामकाज अपुरे राहू नये म्हणून रविवारी (दि. ५) ही सभा घेण्यात अाला. अाता पुढील निवडणूक हाेईपर्यंत ही कार्यकारिणी काळजीवाहू म्हणून काम करणार अाहे.
 
अाठवडाभरात निवडणूक जाहीर हाेण्याची शक्यता 
सावानाच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ मार्चला संपुष्टात अालेला अाहे. त्यामुळे पुढील निवडणूक लवकरच जाहीर हाेण्याची शक्यता अाहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माधवराव भणगे काम बघण्याची शक्यता अाहे. मतदारांची यादी लवकरच भणगे यांना देण्यात येणार असून, त्यानंतर भणगे निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. 

 
बातम्या आणखी आहेत...