आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस, दांडियाप्रेमींचा हिरमाेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात रविवारी सकाळी आणि सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सायंकाळी वाजेच्या सुमारास काेसळलेल्या पावसामुळे शहरवासीयांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळे दांडियाप्रेमींच्या उत्साहावर पाणी पडले. गत २४ तासांत २५ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान केंद्रात झाली अाहे.
शहरात रविवारी पहाटे हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. त्यानंतर शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांची वर्दळ सुरू झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास शहरात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अर्धा ते पाऊण तास पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. याचदरम्यान नाशिकरोड परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे दांडियांच्या मैदानांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाल्याने दांडियाप्रेमींचा हिरमोड होत आहे.

भगूरलापाणी तुंबले :देवळाली, भगूर परिसरात पाऊस पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. देवळाली कॅम्पला आठवडे बाजार असल्याने नागरिकांची धांदल उडाली होती. तर, भगूरला देवी मंदिराजवळ केंद्रीय विद्यालयाजवळ पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. तर, रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना पाण्यातून पदक्रमण करून जावे लागत होते.

दसकला वीज काेसळली
दसकगावात रविवारी सायंकाळी वीज कोसळून अनेक घरांमधील विजेच्या उपकरणांचे नुकसान झाले. यामध्ये जीवितहानी झाली नाही. नागरिकांचे सेटटाॅप बाॅक्स, टीव्ही, विजेची उपकरणे, दिवे, फ्यूज जळाले. शेजारी राहणाऱ्या नगरसेविका मंगला आढाव यांच्या घरातील टीव्हीचेही वीज कोसळल्याने नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...