आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चळवळीचे विद्रोही पर्व संपले’- कैलास कमोद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- साहित्याबरोबरच दलित चळवळीला नवी दिशा देणारे विद्रोही कवी, विचारवंत व दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या निधनाने साहित्य चळवळीत पोकळी निर्माण झाली असून, साहित्यातील प्रतिभावंत हरपला असल्याचे प्रतिपादन ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष कैलास कमोद यांनी केले.

कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयातर्फे आयोजित र्शद्धांजली सभेत ते बोलत होते. ढसाळ यांचे साहित्य नव्या जाणिवांना चेतना देणारे होते, असेही कमोद म्हणाले. माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ म्हणाले, ढसाळ यांनी आपल्या साहित्यातूनच नव्हे, तर जीवनाद्वारेही जातीयवादाला हादरे देण्याचे काम केले. त्यांच्या सर्मथ लेखणीने नवे मानदंड निर्माण केले. या वेळी काशिनाथ वेलदोडे, प्रा. प्रशांत देशपांडे, रविकांत शादरूल, नाना शिंदे आदींनी ढसाळांच्या कवितांचे वाचन केले. राजू नाईक यांनी प्रास्ताविक केले, तर नागार्जुन वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शिवाजी लांडे, रोहित कसबे, महादेव कांबळे, दत्तू तुपे आदी उपस्थित होते.

समाजातल्या तळागाळातील तरुणांना चळवळीच्या माध्यमातून पुढे आणणारे नामदेव ढसाळ हे युवकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थान बनले. अन्याय, अत्याचाराविरुद्ध त्यांनी लढा उभारला, तर पँथर चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजकारण केले. ढसाळ सत्तेपुढे कधीच झुकले नाहीत. परिवर्तनाची दिशा देणारे नामदेव ढसाळ यांच्या जाण्याने चळवळीचे विद्रोही पर्व संपले आहे. परंतु, त्यांच्या लेखणीतून, विचारांतून शेकडो ढसाळ निर्माण होतील, असे प्रतिपादन आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले. प. सा. नाट्यगृहात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी नानासाहेब भालेराव, नगरसेविका कविता कर्डक, प्राचार्य दिलीप धोंडगे, अण्णासाहेब कटारे, कैलास पगारे, कवी किशोर पाठक, करुणासागर पगारे, जयंत भालेराव, दीपचंद दोंदे, प्रा. डॉ. इंदिरा आठवले, किशोर घाटे उपस्थित होते.

कवितांमधून र्शद्धांजली

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोही चळवळ उभी करणार्‍या कवी नामदेव ढसाळ यांना अनेक कवींनी ढसाळ यांच्या कविता सादर करून र्शद्धांजली वाहिली. ‘माणसाने.’, ‘चिंध्याची देवी’, ‘ज्ञानोबा, आई’, ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ यांसह विविध कविता सादर करण्यात आल्या.