आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दयी पित्याने मुलाला दिले मच्छर अगरबत्तीने 40 चटके, बाेबडा बाेलत असल्यामुळे राग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संस्कारच्या मानेवरही चटक्यांच्या जखमा अाहेत. - Divya Marathi
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संस्कारच्या मानेवरही चटक्यांच्या जखमा अाहेत.
नाशिक - मुलगा बोबडा बोलतो याचा राग अाल्याने निर्दयी पित्याने अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलाला मच्छर अगरबत्तीने तब्बल ४० चटके दिले. तत्पूर्वी विरोध करणाऱ्या पत्नीस त्याने मारहाण करून घराबाहेर काढून दिले. गुरुवारी रात्री गोंदे दुमाला फाटा येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून जखमी मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अघाेरी विद्या प्राप्त करण्यासाठी या पित्याने हा प्रकार केला असावा, असा संशयदेखील व्यक्त करण्यात येत अाहे. आघोरी विद्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

गोंदेफाटा येथे हेमंत राऊत हा पत्नी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा संस्कार यांच्यासह भाडेतत्वार राहतो. गुरुवारी रात्री संशयित हेमंत याने मुलगा बोबडा बोलतो, याचा राग अाल्यामुळे अाधी पत्नीला बेदम मारहाण करुन घराबाहेर हाकलले. आतून कडी लावून घेतली अाणि झोपेत असलेल्या लहानग्या संस्कारला मच्छर अगरबत्तीने चटका दिला. पहिला चटका बसल्यानंतर संस्कार ओरडतच जागा झाला आणि रडायला लागला. त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत हेमंतने त्याच्या सर्वांगला चटके देणे सुरुच ठेवले. पत्नीने खिडकीतून हा प्रकार पाहिला अाणि मदतीसाठी आरडाओरड सुरू केली केली. मात्र कोणीच तिच्या मदतीला आले नाही. चटक्यांमुळे कोवळा संस्कार बेशुद्ध पडल्यानंतर सकाळी या निर्दयी पित्याने दरवाजा उघडला. तशाच अवस्थेत अाईने संस्कारला दवाखान्यात नेले. चटक्यांच्या जखम खोलवर असल्याने त्यास पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. याप्रकरणी संशयित हेमंत राऊत याच्याविरोधात वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताे फरार झाला आहे. 
 
अघोरी विद्याचा प्रकार : हेमंत हा पेट्रोल पंपावर काम करतो. मुलगा बोबडा बोलत असल्यास त्याला चटके दिल्यानंतर स्पष्ट बोलतो, असा गैरसमज ग्रामीण आणि अदिवासी भागात आहे. या अंधश्रद्धेतून त्याने मुलाला चटके दिल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. मात्र परिसरातील नागरिकांनी मात्र हा प्रकार त्याने अघाेरी विद्या प्राप्त करण्यासाठी केल्याची शंका व्यक्त केली. 
 
पुढील स्‍लाइडवर...संस्कारच्या पायावर चटक्यामुळे झालेल्या जखमा. 
 
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संस्कारच्या मानेवरही चटक्यांच्या जखमा अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...