आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पेठ रस्त्यावरील शासकीय आदिवासी वसतिगृहात रोहिदास जाखेरे या विद्यार्थ्याला भोजन पुरवठा करणाऱ्या गुरुकृपा कंपनी ठेकेदाराचा प्रतिनिधी दीपक बोधले याने शुक्रवारी (८ मे) मारहाण केली होती. याविरोधात आदिवासी संघटनांनी संबंधित प्रतिनिधीविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला. तसेच, आदिवासी विकासमंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, अप्पर आयुक्त यांना निवेदन देऊन बोधलेवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष लकी जाधव यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
त्यामुळे मे रोजी वसतिगृहात झालेल्या मारहाण प्रकरणी या संघटनेची गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. शिक्षणात बाधा आणणाऱ्याविरोधात त्वरित कारवाईचे आश्वासन संघटनेला देत बोधले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना साध्या जेवणावरून जर ठेकेदार मारीत असतील तर वसतिगृहाचे गृहपाल हे काय करतात, हा प्रश्न निर्माण होत आहे. गृहपालांनी चोवीस तास वसतिगृहात थांबून विद्यार्थ्यांची काळजी घेणे बंधनकारक आहे. मात्र, गृहपाल हे वसतिगृहात थांबतच नसल्याने विद्यार्थीही मनमानीप्रमाणे वागत असल्याचे पुढे आले होते.
विद्यार्थ्याला न्याय द्या
जो पर्यंतसंबंधित विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत संघटना मागे हटणार नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्या विद्यार्थ्याला त्वरित न्याय द्यावा, अन्यथा सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल.
लकी जाधव, विभागीय अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद
बातम्या आणखी आहेत...