आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वींच्या अाराेपांमुळे व्यथित ग्यानदास यांना अश्रू अनावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महंत ग्यानदास - Divya Marathi
महंत ग्यानदास
नाशिक- ‘मुख्यमंत्र्यांसमाेर साध्वींना बाेलता यावे म्हणून मी माईक हातात घेत हाेताे. परंतु, त्यांनी जे विनयभंगाचे अाराेप केले त्याने मी कमालीचा व्यथित झालाे अाहे. अामच्यासाठी असे अाराेप मरणासमान असतात. अाम्ही महिलांकडे माता, भगिनी अाणि कन्येच्या रूपात बघताे. त्यामुळे अशा प्रकारचे लांच्छनास्पद अाराेप अाम्ही सहन करू शकत नाही. हे अाराेप सहन हाेत नसल्याने सिंहस्थापूर्वीच नाशिक साेडावेसे वाटतेय. ‘चडीया की जान जा रही है, अाैर बच्चे खेल रहे है...’ अशा भावना व्यक्त करताना अाखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांना अश्रू अनावर झाले हाेते. साध्वींचा बाेलविता धनी अन्य काेणी तरी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
महिला साध्वींच्या अाखाड्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महिला परी अाखाड्याच्या साध्वी त्रिकाल भवंता सरस्वती यांनी ध्वजाराेहण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमाेरच माईकवर बाेलण्याचा प्रयत्न केला हाेता. या वेळी महंत ग्यानदास महाराजांनी त्यांच्या हातातील ध्वनिक्षेपक खेचण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला हाेता. ‘ग्यानदास महाराजांनी अापला विनयभंग केला’ असा अाराेप करून साध्वींनी महाराजांना काेर्टात खेचण्याचा इशारा दिला हाेता. या अाराेपांना ग्यानदास महाराजांनी उत्तरे दिली. परंतु, स्पष्टीकरण करताना त्यांचा कंठ दाटून अाला.

ते म्हणाले की, ‘बदनामीचा हा डाग प्रचंड अस्वस्थ करीत अाहे. मी प्रचंड खचलाे अाहे. हृदयविकार असल्याने माझे भक्तगणही चिंतीत अाहेत. माझ्या मनात महिलांविषयी काही वाईट भावना असतील तर मी परमेश्वराकडे प्रार्थना करताे की, मला लगेचच मरण दे. माध्यमांनीही अामच्यावर अत्याचार केला अाहे.’

मानवाधिकार आयोगांकडे तक्रार करणार : साध्वी
‘ग्यानदास महाराज यांची मला भीती वाटते. त्यांच्यापासून मला धोका असल्याचे स्पष्टपणे जाणवते’, असा आरोप साध्वी त्रिकाल भवंताजी महाराज यांनी केला. त्यांनी एका महिला संताचा अपमान केला अाहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, याप्रकरणी आता थेट पोलिसांत फिर्याद देण्यात येईल. तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे अाणि महिला व मानवाधिकार आयोगांकडेही तक्रार करणार अाहे’, असे साध्वी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...