आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीस पिस्तूल दाखवून लग्नासाठी धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - विहितगाव येथील सौभाग्यनगर बसस्टाॅपजवळील नाना-नानी पार्कमध्ये एकाने आपल्या साथीदारासह अल्पवयीन मुलीला पिस्तूल दाखवून लग्न करण्यासाठी धमकी दिली. लग्न केल्यास तिच्यासह कुटुंबीयांना मारून टाकण्याचीही धमकी दिली. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मुरकुटे हा एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. शनिवारी त्याने त्याच्या साथीदारासह ही अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीला धमकी देत नाना-नानी पार्कमध्ये येण्यास सांगून ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्यासह घरच्यांना पिस्तूलने मारून टाकेन’, अशी दमदाटी केली. याबाबत संबंधितांनी नाशिकराेड पाेलिसांत याबाबत तक्रार केल्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेने नाशिकराेड परिसरात खळबळ उडाली.
बातम्या आणखी आहेत...