आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालट्रकच्या धडकेत कारागृह रक्षक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - मध्यवर्ती कारागृहास जलकुंभातून पाणी साेडून ड्यूटीवर जाणारे तुरुंगरक्षक मदनलाल गुलाब माेरे यांचा मालट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. साेमवारी (दि. ३) सकाळी दहाच्या सुमारास जेलराेड रस्त्यावरील इंगळेनगर चाैकातील जलकुंभासमाेर हा अपघात झाला. या चाैकात गेल्या सहा महिन्यांत अपघातामध्ये गेलेला चाैथा बळी अाहे.
जलकुंभातून कारागृहाला पाणी साेडण्याची जबाबदारी असलेले माेरे कारागृहासाठीचा वाॅल्व सुरू करून कारागृहाकडे पायी जात असताना दसककडून नाशिकराेडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने (एम. एच. १८ ए. ए. ७२७५) त्यांना पाठीमागून जाेरदार धडक दिली. मालट्रकचे चाक पाेटावरून गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. कारागृहाचे रक्षक किरण पाटील, वानखेडे, भुसारे तसेच शिवसेनेचे माजी विभागप्रमुख विक्रम खराेटे, परीक्षित तळेकर, बाळासाहेब शेलार यांनी तत्काळ माेरे यांना महापालिकेच्या बिटकाे रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. माेरे यांच्या पश्चात अाई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार अाहे. त्यांच्या पार्थिवावर मूळ गाव पाचाेरा येथे अंत्यसंस्कार हाेणार अाहेत. पार्थिवाला कारागृहाच्या वतीने त्यांना सलामी देण्यात अाली.

नव्याचे नऊ दिवस
सहा महिन्यात अनेक अपघात झाले. चाैघांनी जीव गमावला, तर अनेकांना अपंगत्व अाले. या रस्त्यावर अवजड वाहतूक बंद करावी, वाहतूक पाेलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी केली मात्र, ‘नव्याचे नऊ दिवस’ या धर्तीवर वाहतूक पाेलिसाने ड्यूटी केल्यानंतर दाेन महिन्यांपासून वाहतूक पाेलिसाचे दर्शन झालेले नाही.