आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Use Of Ethanol In The Name Of The Gas Chamber

गॅस चेंबरच्या नावाखाली इथेनॉलचा वापर, काही तासांत आंबे पिकवण्यासाठी धोकादायक शक्कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळे पिकविण्यासाठी घातक कार्बाईडचा वापर बंद केल्याच्या नावाखाली फळ व्यापाऱ्यांकडून अाता कार्बाईडपेक्षाही घातक असलेल्या इथेनाॅलचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यातून नागरिकांच्या जिवाशी अप्रत्यक्ष जीवघेणा खेळ सुरू असून, अन्न आणि औषध प्रशासन विभाग मात्र नियमांवर बोट ठेवून अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांना घातक फळे विक्री करण्यासाठी प्रोत्साहितच करत असल्याच्या या वास्तवावर ‘डी.बी. स्टार’ने टाकलेला प्रकाशझोत...
आर. एफ. कोळी, सहा.आयुक्त, अन्न औषध प्रशासन, नाशिक
इथेनॉलचावापर जास्त प्रमाणात केला जातो का?
नियमिततपासणी सुरू आहे. अद्याप तरी काही आढळून आले नाही. व्यापाऱ्यांच्या गॅसचेंबरची तपासणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

व्यापाऱ्यांवर कारवाई कधी करणार?
गैरप्रकारेफळे पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते. शेड्यूल चारच्या निकषाप्रमाणे तपासणी केली जाते. त्याप्रमाणे अहवाल बनवला जातो आणि कारवाई केली जाते.

कारवाईचे स्वरूप कसे असते?
संबंधित दोषी आढळल्यास अन्न औषध प्रशासन नियमांतर्गत कलम ५० ते ५३ नुसार कुठल्या प्रकारात दोषी अाढळते, त्यानुसार कारवाई केली जाते. दंडात्मक, न्यायालयात खटला आणि तपासात सहकार्य केल्यास फौजदारी कारवाई केली जाते.
इथेनॉलया घातक रसायनाचा वापर करून फळे पिकविण्याचा गोरखधंदा गॅसचेंबरधारक व्यापाऱ्यांसह बहुतांश फळविक्रेत्यांनी मांडला आहे.
आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. कलिंगडांचा हंगाम जोरावर आहे. काही व्यापाऱ्यांकडे सर्वच जातीचे पिवळेधमक आंबे विक्रीकरिता आले आहेत. वरचेवर पिवळे दिसणाऱ्या या आंब्यांमध्ये घातक रसायनांची अधिक प्रमाणात मात्रा असल्याने ते केवळ एका रात्रीत पिवळे केले जातात. इथेनॉलच्या माध्यमातून कैरी दोन दिवसांत पिकवली जाते. आंबे पिकवण्याकरिता व्यापारी गॅसचेंबरचा वापर करतात. मात्र, गॅसचेंबरमध्ये फळ पिकविण्याच्या प्रक्रियेस किमान दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागतो. मात्र, व्यापारी पैसे कमवण्याच्या मोहापाई इथेनाॅलचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
चेंबरच्या नावाखाली जिवाशी खेळ
फळव्यापारी गॅसचेंबरच्या नावाखाली आंबे आणि फळे इथेनॉलच्या मिश्रणात बुडवून घेतात. नंतर ते कॅरेटमध्ये ठेवून चेंबरमध्ये ठेवतात. रात्री ठेवलेले हे आंबे रातोरात पिवळे होतात. अन्न औषध प्रशासनाकडून मागील वर्षी सात व्यापाऱ्यांना चेंबरचा परवाना देण्यात अाला होता. यावर्षी अठरा व्यापाऱ्यांना परवाने दिले आहेत. फळ मार्केटसह शहरातही गॅसच्या माध्यमातून आंबे पिकवले जात असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक होत आहे.
निर्जनस्थळी होते प्रक्रिया...
फळेपिकविण्यासाठी बहुतांश व्यापारी निर्जन ठिकाणांचा वापर करतात. अधिक प्रमाणात रसायनांचा वापर करून ती बाजारपेठेत आणली जातात. कॅरेट आणि रास लावून ती चेंबरमध्ये ठेवली जातात. ही प्रक्रिया एकाच दिवसात होते. दुसऱ्या दिवशी कच्चा आंबा पिवळा होऊन मार्केटमध्ये विक्रीकरिता उपलब्ध होतो.

या ठिकाणी चालतो गोरखधंदा
फळमार्केट, भद्रकाली, द्वारका, सिडको, आडगाव, पेठरोड, दिंडोरीरोड, राणेनगर, सातपूर, चुंचाळे शिवार, देवीचौक, नाशिकरोड, रविवार कारंजा, नानावली, नाशिकरोड न्यायालय परिसर या भागात फळे पिकविण्याचा धंदा सुरू आहे.
शहराबाहेर असते गुदाम
फळव्यापाऱ्यांनी शहराबाहेर फळ साठवणूक केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारण िनर्जन ठिकाणी कुणाला सुगावा लागू नये हा उद्देश आहे. येथे रसायनांत मिश्रण केलेले आंबे सुकवले जातात.
आंब्याची आवक कमी
शरदपवार फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक कमी असल्याचे सांगण्यात येते. रोज १५० ते ३०० क्विंटल आंबे या मार्केटमध्ये उतरवले जात आहेत. यात हापूस, केसर, लालबाग, बदामचा समावेश आहे.
व्यापाऱ्यांवर वरदहस्त
फळव्यापाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने बहुतांशी व्यापारी हे खुलेआमपणे घातक रसायनांचा वापर करून कमी वेळात फळे पिकवून पैसे कमवत असल्याची चर्चा खुलेआम व्यापाऱ्यांमध्ये आहे.
शासकीय अंकुश नाही
इथेनॉलद्वारेफळ पिकविण्याची परवानगी कृषी विभागाकडून िदली जाते. मात्र, कृषी विभागाच्या िनयमांनुसार किती व्यापारी फळे पिकवतात यावर मात्र अन्न आणि औषध विभागाचा अंकुश नाही.
या फळांवर होते प्रक्रिया
आंबा,कलिंगड, खरबूज, चिकू, केळी, सफरचंद यावर रसायनांचा वापर करून ती केवळ एका दिवसांत पिकवण्यात येतात. स्वार्थासाठी काही व्यापारी फळे पिकविण्यास इथेनॉल रसायनाचा अधिक वापर करतात.
सहआयुक्त कायम व्यस्तच...
अन्नआणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते कायम व्यस्त असतात. चंद्रकांत पवार यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.
मिश्र फळांना असे ओळखा...
पिवळादिसणारा आंबा आणि केळी बाहेरून कडक असतात. आंबा आंबट लागतो, तर केळी निचव लागते. तोंडामध्ये खवखव होते. आंब्याचा देठ आणि केळीची फणी काळी दिसते. चिकूचा रंग चॉकलेटी होतो.
विभागाने कारवाई करावी
संबंधित विभागास कारवाईचा अधिकार आहे. त्यांच्या कारवाईप्रमाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो.
-शांताराम अवसरे, वरिष्ठनिरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे
वापर अपायकारक
इथेनॉलचाअतिप्रमाणात वापर शरीरास अपायकारक आहे. मंददृष्टी, त्वचारोग, पोटाचे विकार, अपचन आणि अधिक वापराने यकृतावरदेखील याचा विपरित परिणाम होतो. औषधांचा जास्त प्रमाणात वापर हा सर्वांना घातकच ठरतो.
-डॉ.राजेंद्र भांबर, प्राचार्य,फार्मसी महाविद्यालय
अशी आहे वापराची मर्यादा...
इथेनॉलमिसळण्याचे प्रमाण दोन टक्के आहे. २०० पीपीएमपर्यंत चेंबरमधील गॅसमध्ये वापर करता येतो. या प्रक्रियेला चार दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, व्यापारी हव्यासापोटी अधिक प्रमाणात एका पिंपामध्ये इथेनॉल रसायन फळांमध्ये मिसळून ते गॅस चेंबरमध्ये सुकवण्यासाठी ठेवतात. रसायनाच्या अधिक वापराने कच्ची फळे रात्रीतून पिवळी होतात.