आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अत्याधुनिक मशीनद्वारे हटविणार पाणवेली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गोदावरीच्या वाढत्या प्रदूषणामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने गाेदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गोदावरी नदीचे सध्याचे आर्ट ऑफ लिव्हिंग, जेएसडब्ल्यू डायनामिक प्रीस्ट्रेस या संस्थेच्या प्रयत्नातून अत्याधुनिक मशीनद्वारे गोदावरीची स्वच्छता केली जाणार आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी आनंदवली पुलाच्या परिसरातील नदीपात्रातील स्वच्छता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
गोदावरी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनासह, अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, जेएसडब्ल्यू डायनामिक प्रीस्ट्रेस या संस्थेद्वारे अॅक्टोटेक व्हीड हॉर्वेस्टर-ट्रॅश स्कीमर भाडेतत्त्वावर घेऊन महापालिकेच्या मदतीसाठी आणली आहेत.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधत या मशीनचा प्रारंभ आनंदवली येथील पुलाजवळील नदीपात्रात मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, शहर अभियंता सुनील खुने, जेएसडब्ल्यूचे संजय गोयल, आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके आदी मान्यवर उपस्थित होते. या मशीनद्वारे नदीतील पाणवेली, गवत आदी कापून झाल्यावर मशीन जमा करण्यात येणार आहे. चार महिन्यांपर्यंत नदीपात्राची स्वच्छता करण्यात येणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर या मशीनद्वारे नदीपात्राची स्वच्छता केली जाणार आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास आणखी एक याच प्रकारचे मशीन गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी मागविण्यात येणार आहे. अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने नदीपात्राची स्वच्छता करणार असल्यामुळे लवकरच नदी पाणवेली मुक्त होऊन स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.
समाजासाठी आमचेही काही देणे लागते...
- समाजासाठीकाही आमचेही काही देणे लागते. त्यामुळे आगामी कंुभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि डायनामिक प्रीस्ट्रेस या संस्थांच्या सहकार्याने या मशीनद्वारे चार महिने गोदामाईची स्वच्छता करण्यात येणार आहे. या मशीनच्या साहाय्याने नदीपात्रातील पाणवेली, कचरा साफ केला जाणार आहे. त्यामुळे गोदापात्र स्वच्छ होण्यास मदतच होईल.
संजय गोयल, जेएसडब्ल्यू
गोदावरीच्या स्वच्छतेसाठी मदत होणार
- गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छ, प्रदूषणमुक्त होण्यासाठी या संस्थेच्या मदतीने आणलेल्या या अत्याधुनिक मशीनने गोदावरीच्या स्वच्छतेसाठी मदत होणार आहे. महापालिकेला मोठी मदत होणार आहे.
अशोक मुर्तडक, महापौर
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मशीनची वैशिष्ट्ये..