आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध मावळतोय; रुंदीकरणास सहकार्याचा सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रविवारपेठ ते अशोकस्तंभ या रस्त्याच्या रुंदीकरणास व्यापारी व्यावसायिकांकडून होत असलेला तीव्र विरोध आता काही प्रमाणात मावळत असून, प्रस्तावित रुंदीकरणास सहकार्य करण्याचा सूर सोमवारी झालेल्या बैठकीत बहुतांश व्यावसायिकांच्या बोलण्यातून उमटला. दरम्यान, माजी महापौर अॅड. यतिन वाघ यांनी रुंदीकरण करण्यासाठी कोणावरही सक्ती केली जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच स्वेच्छेने जागा दिल्यास त्या बदल्यात कायद्याप्रमाणे मोबदला दिला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही दिली. काही व्यावसायिकांनी मात्र रुंदीकरणास विरोध दर्शवला.
रविवार पेठ परिसरातील कन्सारा मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी ही बैठक झाली. बैठकीस माजी महापौर अॅड. वाघ, नगरसेविका सुरेखा भोसले, महापालिकेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन जाधव यांच्यासह पाणीपुरवठा, विद्युत या विभागाचे अधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते. रविवार पेठ रस्त्याच्या रुंदीकरण काँक्रिटीकरणावरून वाद निर्माण झाला आहे. रुंदीकरणाला काही व्यावसायिकांचा विरोध आहे. त्यामुळे या बैठकीत व्यावसायिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यात मनीष डास, रमेश कासार, निवास मोरे, संजय जगताप, प्रकाश तांबट, ओमप्रकाश मोरे, प्रफुल्ल संचेती, मदन दायमा, प्रसन्न तांबट, चंद्रकांत पारख, विजय फडके यांच्यासह व्यापारी सहभागी झाले होते.
काँक्रिटीकरणाचे काम जलद पूर्ण करून पाणी, ड्रेनेज, विद्युत तारा या सर्व सुविधा उपलब्ध करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. तसेच रुंदीकरण करताना विश्वासात घेतले जावे, अशी मागणी केली. महापौर अॅड. वाघ यांनी व्यावसायिकांच्या भावना लक्षात घेऊन रुंदीकरणास सक्ती केली जाणार नसल्याची ग्वाही दिली.
तेथे पेव्हर ब्‍लॉक आणि काँक्रिटीकरण
स्वेच्छेने जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यावसायिकांना मोबदला दिला जाणार असून, संबंधित जागा लक्षात घेऊन त्यावर पेव्हर ब्लॉक काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता सचिन जाधव यांनी या वेळी दिली.