आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यगृहांच्या आरक्षणासाठी पालिकेचे सकारात्मक पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरातील नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या तारखांच्या बुकिंगसाठी कंत्राटदारांकडे विनवण्या कराव्या लागत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने एप्रिल ते जूनपर्यंतचे आरक्षणाच्या तारखा खुल्या केल्या आहेत. तसेच मनपाच्या वतीने इच्छुक नागरिकांना १५ जानेवारीपर्यंत तारखांचे बुकिंग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, पं. पलुस्कर सभागृह तसेच नाशिकरोडचा महात्मा गांधी टाऊन हॉल येथे एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत काेणताही कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी संबंधित तारखांचे बुकिंग करणे शक्य आहे. ज्या व्यक्ती, संस्था, संघटनेला नाट्यगृहाचे आरक्षण करायचे असेल, त्यांनी ते १५ जानेवारीपर्यंत महाकवी कालिदास कलामंदिरात कार्यालयीन वेळेत करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सातत्याने असे आवाहन करीत असतो, मात्र...
-महापालिकेच्यावतीने नियमितपणे तारखांची बुकिंग करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत असते. मात्र, त्याला नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्याएेवजी एेनवेळी येणाऱ्या नागरिकांचे आणि संस्थांचे प्रमाण मोठे आहे. पण, तोपर्यंत संबंधित तारखा कंत्राटदाराकडे आरक्षित झालेल्या असल्यास त्या तारखा उपलब्ध करून देणे आम्हाला शक्य होत नाही. -जगन्नाथ कहाणे , व्यवस्थापक , कालिदासकलामंिदर

कंत्राटदारांना मुभा १५ तारखेनंतरच
जूनमहिन्याअखेरपर्यंतच्या तारखांचे बुकिंग करण्याची सुविधा कंत्राटदारांना १५ जानेवारीनंतरच मिळणार आहे. त्यामुळे तोपर्यंत खुल्या असलेल्या सर्व तारखांमधून नागरिकांना बुकिंग करणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी किंवा संबंधित संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.