आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएम’वर ग्राहकांना ठकविणारा अखेर जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एटीएम बाहेर उभे राहून तेथे पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकास मदत करण्याच्या नावाखाली त्याचा पासवर्ड व पिन क्रमांक माहीत करून त्याच्या बॅँक खात्यातील रक्कम साफ करणार्‍या भामट्यास अखेर जेरबंद करण्यात आले. पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने यात यश मिळविले. दरम्यान, राज्यभरातील विविध ठिकाणी या संशयिताने एक लाख रुपयांची लूट केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी वीरेंद्र बिलबहाद्दर कौशल (वय 33, रा. सौभाग्यनगर, लॅमरोड) यास पोलिसांनी जुन्या आग्रा रोडवरील स्टेट बॅँकेच्या एटीएमवर सापळा रचून अटक केली. तो मूळचा उत्तर भारतातील आहे. राजेश चंद्रकांत भोये (रा. त्र्यंबकेश्वर) यांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी कौशलने मदत केली व पिनकोड माहीत करून 17 हजार रुपये काढले. या वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी कौशलला रंगेहात पकडले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक फटांगरे यांनी ही कारवाई पार पाडली.