आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर सुरक्षा ज्यांच्या शिरी, त्यांच्याच ‘घरात’ हाेते चाेरी; पाेलिस मुख्यालयातील चोरीने अाश्चर्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहर परिसरात काही दिवसांपासून घरफाेडी जबरी चाेरीच्या घटनांमध्ये वाढ हाेऊन त्या नियंत्रणात अाणण्यासाठी पाेलिसांकडून उपाययाेजना राबविल्या जात असतानाच पाेलिस मुख्यालय अावारातील माेटार परिवहन विभागाचे कुलूप ताेडून अातील बॅटऱ्या, रेडीएटर चाेरीचा प्रकार उघडकीस अाला अाहे. या प्रकाराने ज्यांच्या शिरावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अाहे, त्यांच्याकडे चाेरी झाल्याचे दिसून अाले. 

पाेलिस आयुक्तालयातील मोटर परिवहन विभागाचे कार्यालय सीबीएसच्या मागील बाजूस मुख्यालयात अाहे. याठिकाणी ते २४ जूनच्या कालावधीत ठेवलेल्या वाहनांच्या बॅटरी, रेडीएटर असा सुमारे १५ ते २० हजाराचे साहित्य चारट्यांनी लांबविले. याप्रकरणी विभागातील पाेलिस कर्मचारी राजेंद्र बावीस्कर यांनी सरकारवाडा पाेलिस ठाण्यात तक्रार दिली असता अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

या तक्रारीनुसार, कार्यालयाचे कुलूप तोडून वीज तांत्रिक विभागात ठेवलेल्या १२ व्होल्ट क्षमतेच्या दाने एक्साईड बॅटरीज विभागात दुरुस्तीसाठी आलेल्या एमएच १५ एए २५५ या क्रमांकाच्या वाहनाची बॅटरी आणि एमएच १५ एए ४१३६ क्रमांकाच्या वाहनाचे रेडीएटर असे १५ हजारांचे साहित्य लांबविले. पोलिस हवालदार राठोड पुढील तपास करीत आहेत. नियमित पाेलिसांची वर्दळ असतानाही चाेरीचा प्रकार घडल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. 

सिग्नलवरील इन्व्हर्टरसह बॅटऱ्या केल्या लंपास... 
पाेालिसांच्या माेटार परिवहन विभागातील चाेरीपाठाेपाठ अाता सिग्नलही सुरक्षित नसल्याची बाब उघडकीस अाली अाहे. कॅनडा कॉर्नर वरील सिग्नल नियंत्रण करणाऱ्या खांबाव रील इन्व्हर्टरसह बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. नितीन धामणे (रा. गोविंदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी (दि. २३) मध्यरात्रीच्या सुमारास सिग्नलमध्ये असलेल्या सुक्याम कंपनीचे इन्व्हर्टर आणि बॅटरी असा २० हजाराचा ऐवज चोरून नेला. हवालदार राठोड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...