आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी वाढली, दहा लाखांच्या स्कोडा कारसह वाचा काय काय पळवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आडगाव येथे घराबाहेर उभी केलेली सुमारे १० लाखांची स्कोडा कार शुक्रवारी मध्यरात्री चोरीस गेल्याची तक्रार आडगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. सुमीत प्रभाकर मुर्तडक (रा. बालाजी हाइट्स, महालक्ष्मीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, घराबाहेर उभी असलेली त्यांची स्कोडा कार (एमएच ०५, ९०७६) आणि कारमधील अॅपल कंपनीचा मोबाइल चोरीस गेला आहे.
गॅरेजसमोर उभा केलेला डंपर लांबविला
महामार्गावरीलएका मोटार गॅरेजसमोर रस्त्यावर उभा केलेला डंपर शनिवारी रात्री चोरीस गेला आहे. रफिक रहेमान अजिज शेख यांच्या मालकीचा एका गॅरेजसमोर उभा केलेला डंपर (एमएच ०४, डीडी ४८०२) चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.